पारडा दराडे परिसरात वन्यप्राण्यांचा हैदाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:41+5:302021-06-10T04:23:41+5:30
देऊळगाव कुंडपाळ : येथून जवळच असलेल्या पारडा दराडे परिसरात गत काही दिवसांपसून वन्यप्राण्यांचा हैदाेस सुरू आहे़. राेहीच्या कळपाने एका ...
देऊळगाव कुंडपाळ
: येथून जवळच असलेल्या पारडा दराडे परिसरात गत काही दिवसांपसून वन्यप्राण्यांचा हैदाेस सुरू आहे़. राेहीच्या कळपाने एका शेतकऱ्याच्या शेतातील भाजीपाला पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे़.
पारडा दराडे येथील रामेश्वर बद्री दराडे यांनी आपल्या शेतात मिरची, भेंडी, टमाटे, चवळी आदी भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली आहे़. त्यासाठी अंदाजे ३० ते ४० हजार रुपये खर्चही केला़; परंतु वीस ते पंचवीस रोहींच्या कळपाने भाजीपाला पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे दराडे यांचे अंदाजे दीड लाखांपर्यंत नुकसान झाले़. परिसरात
रोही, रानडुक्कर, माकड आदी वन्यप्राण्यांचा हैदाेस सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़. या वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य राम किसन दराडे यांनी केली आहे़.