सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- तुपकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 04:51 PM2018-09-29T16:51:33+5:302018-09-29T16:54:11+5:30

सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे प्रतिपदान स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी धामणगाव बढे येथे केले.

will give justice to Soybean, cotton grower - Tupkar | सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- तुपकर 

सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही- तुपकर 

Next

धामणगाव बढे: येत्या दोन आॅक्टोबरला बुलडाणा येथे होऊ घातलेल्या सोयाबीन कापूस परिषदेच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या आंदोलनामध्ये सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे प्रतिपदान स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी धामणगाव बढे येथे केले. परिषदेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत गर्दे वाचनालयात ही परिषद होत आहे. त्याच्या नियोजनाच्या दृष्टीने तुपकर यांनी मोताळा तालुक्यातील दाभा, सारोळा मारोती, सिंदखेड लपाली, खांडवा या गावात जाहीर सभा घेतल्या. सोबतच शेतकर्यांना सोयाबीन-कापसाचे अर्थशास्त्र समजावून सांगत या परिषदेच्या माध्यमातून शेतकर्यांनी स्वत:च्या नाय हक्कासाठी लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे सांगितले. शेतकर्यांच्या प्रश्नावर सध्याचे सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. या सरकारला खाली खेचण्यासाठी व शेतकर्याना न्याय मिळवून देण्यासाठी सोयाबीन, कापसाच्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन तुपकर यांनी केले. यावेळी प्रदीप शेळके, महेंद्र जाधव, सय्यद वशीम, गजानन पवार, गंगाधर तायडे, चंदू गवळी, विजय बोराडे, रशीद पटेल, जावेद खान, राजू पन्हाळकर, मुकूंदा शिंबरे, सतिष नवले, कैलास सोनूने, नितीन पुरभे, मोहम्मद इरशाद, दत्ता शिंबरे, गजानन गवळी, बाबुराव सोनुने, नारायण तायडे हे उपस्थित होते. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकरी स्वत:च्या न्यायहक्कासाठी पाच दिवस दुध घरात ठेऊन रस्त्यावर उतरत असतील तर आपल्याकडील शेतकर्यांनीही एक दिवस सोयाबीन सोंगणे बंद ठेऊन सोयाबीन-कापूस परिषदेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन तुपकरांनी शेवटी केले.

Web Title: will give justice to Soybean, cotton grower - Tupkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.