काश्मीर प्रश्नी तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप सहन करणार नाही- शहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 01:58 PM2019-10-11T13:58:31+5:302019-10-11T14:01:40+5:30
काश्मीर प्रश्नी तिसºया देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित सभेदरम्यान दिला.
चिखली (बुलडाणा): काश्मीर हा भारताचा आंतरिक प्रश्न असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच ही बाब स्पष्ट केली आहे. त्यामुळे काश्मीर प्रश्नी तिसºया देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित सभेदरम्यान दिला. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे भारतात पोहोचण्यापूर्वीच बुलडाण्यातील चिखली येथील सभेला संबोधीत करताना अमित शहा यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. अप्रत्यक्षरित्या चीनलाच त्यांनी स्पष्ट संदेश काश्मीर प्रश्नी पाकीस्तानच्या सुरात सुर मिळविणाºया चीनलाच अप्रत्यक्षरित्या अमित शहा यांनी हे खडेबोल सुनावले आहेत. चिखलीतील निवडणूक प्रचाराच्या सभेदरम्यान त्यांनी ही भुमिका स्पष्ट केली. गेल्या काही वर्षात भारताने काश्मीर प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. काश्मीर मुद्द्यावर दुसºया कुठल्याही देशाची मध्यस्थता भारतला स्वीकार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी स्पष्ट केलेले आहे. त्या पृष्ठभूमीवर अमित शहा यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण आजच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे तामिळनाडूमधील महाबलीपुरम नजीक एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. त्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हे वक्तव्य आल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे राहूल गांधीवरही त्यांनी जोरदार टिका करीत इंग्लंडच्या लेबर पार्टीचे नेता जेरेमी कॉर्बिन सोबत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने चर्चा करताना काश्मीर प्रश्नीही उहापोह केला आहे. राहूल गांधी यांचे निकटवर्तीय कमल धालीवाल यांनी जेरेमी कॉर्बिन यांची भेट घेऊन काश्मीरमध्ये स्थिती सामान्य नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा आधार घेत अमित शहांनी ही टिका केली. सोबतच काँग्रेस पक्षाचे नेते इंग्लंडमधील नेत्यांसमोर देशाची नेमकी कोणती प्रतिमा मांडू पाहत आहे, असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, कलम ३७० आणि पुर्वोत्तर राज्यातील एनआरसीच्या मुद्द्यांनाही शहा यांनी यावेळी आपल्या भाषणात हात घातला.