कोरोना प्रतिबंधासाठी देणार आरोग्य शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 11:40 AM2020-09-13T11:40:27+5:302020-09-13T11:40:51+5:30
सर्वेक्षण व आरोग्य तपासणीदरम्यान नागरिकांना व्यक्तिश: आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या पाच हजाराच्या टप्प्यात आली असून कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी तथा मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचा एक भाग म्हणून घरपरत्वे सर्वेक्षण व आरोग्य तपासणीदरम्यान नागरिकांना व्यक्तिश: आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भातील सुचना ११ सप्टेंबर रोजीच निर्गमीत केल्या आहेत. यात प्रामुख्याने घराती सर्व सदस्यांना व्यक्तीश: प्री कोवीड, कोवीड आणि पोस्ट कोवीड परिस्थितीनुसार समाजवून सांगून आरोग्य शिक्षण देण्याचे दुहेरी काम ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतंर्गत करण्यात येणार आहे. शहरी तथा ग्रामीण ही मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी या मोहिमेचे नियोजन करणार असून ग्रामीण भागातील मोहिमेचे नियोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे करणार आहेत.
या मोहिमेत प्रामुख्याने अति जोखमीच्या व्यक्तींची ओळख निश्चीत करून करून त्यांना उपचार व कोवीड -१९ च्या प्रतिबंधासाठी आरोग्य शिक्षण देण्याचा मुख्य उद्देश आहे. बुलडाणा जिल्ह्यात रुग्ण दुपटीचा वेग २५ दिवसावर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात संक्रमणाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे या १५ सप्टेंबर पासून सुरू होणाºया मोहिमेतंर्गत प्रत्येक व्यक्तीस आरोग्य शिक्षण देण्याची महत्त्वाची भूमिकाही आरोग्य पथकांना पारपाडावी लागणार आहे. दरम्यान, जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदर १.३४ टक्क्यावर आहे. आयसीएमआरने भाकीत केलेलेल्या समृत्यूसंख्येच्या तुलनेत याचे प्रमाण कमी आहे. त्यातच कौटुंबिकस्तरावर गृहभेट घेवून कोरोना संक्रमणापासून बाचव कसा करावा याचे आरोग्य शिक्षण दिल्यास जिल्हयात संक्रमण रोखण्यास मदत होईल, अशी भावना या मोहिमेमागे आहे. या दरम्यानच सारीसह कोरोना आजाराशी साधर्म्य असलेला एखादा आजार तर कुटुंबात कोणाला झाला नाही ना, याबाबतही माहिती संकलीत केली जाणार आहे.
पाच लाख ६० हजार घरात देणार माहिती
आरोग्य सर्वेक्षणासोबतच २७ लाख लोकसंख्या राहत असलेल्या जिल्ह्यातील सुमारे पाच लाख ६० हजार ८९ घरामधील व्यक्तींना आरोग्य विषयक संदेश दिल्या जाणार आहे. यात सातत मास्क घालून रहावे, मास्क शिवाय घराबाहेर पडू नये, दर दोन ते तीन तासांनी सावणांी हात स्वच्छ धुवावेत, पाण्याची सुविधा नसले तेथे सॅनिटायझरचा वापर करावा, ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्यास जवळच्या जवळच्या फिव्हर क्लिनीकमध्ये जावून तपासणी करावी, दुर्धर आजार असल्यास त्यावरील उपचार सुरू ठेवावे त्यात खंड पडू देवू नये यासह कोवीड संदर्भातील गुंतागुंत साध्या भाषेत कुटुंबाला या आरोग्य शिक्षण मोहिमेतंर्गत अवगत करण्यात येणार आहे.