पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:31 AM2021-03-08T04:31:48+5:302021-03-08T04:31:48+5:30

शेतकरीविराेधी कायदे रद्द करा बुलडाणा : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांविरुद्ध आहेत. हे कायदे तातडीने रद्द करण्याची ...

Withdraw petrol-diesel price hike | पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या

पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्या

Next

शेतकरीविराेधी कायदे रद्द करा

बुलडाणा : केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे शेतकऱ्यांविरुद्ध आहेत. हे कायदे तातडीने रद्द करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी लाेणार तहसीलसमाेर वंचितच्या वतीने धरणे आंदाेलन करण्यात आले.

नरहरी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

बुलडाणा : संत नरहरी महाराज साेनार मंडळाच्या वतीने संत नरहरी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष श्रीराम उज्जैनकर, विश्वनाथ ठाेसर, निलेश रत्नपारखी आदींसह इतर उपस्थित हाेते.

राज्य आदर्श पुरस्कारासाठी रत्नमाला जाधव यांची निवड

बुलडाणा : ग्रामीण भागातील गाेरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबावणारे सावरगाव डुकरे येथील आदर्श शिक्षक प्रभाकर पाटाेळे व लाेणी लव्हाळा येथील शिक्षिका रत्नमाला खरे यांची मानव विकास राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२१ साठी निवड करण्यात आली आहे.

१९ गावांतील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा

सिंदखेड राजा : तालुक्यातील १९ गावांत फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारा पडल्याने शेतात उभ्या असलेल्या गहू, हरभरा, शाळू, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास १९ गावांतील ४ हजार २१५ हेक्टर कृषिक्षेत्र बाधित झाले आहे. या शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही.

लघुपाटबंधारे विभागात रिक्त पदे

बुलडाणा : पाटबंधारे विभागात वर्षभरापासून पदभरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यभार वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणी असून, सिंचन नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

आठवडी बाजार बंदचा व्यावसायिकांना फटका

जानेफळ : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथे शनिवारी भरणारा आठवडी बाजार ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द केला. या बाजारात परिसरातील अनेक व्यावसायिक आपली दुकाने मांडतात. बाजार रद्द झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

रिक्त पदांमुळे कामाचा ताण वाढला

बुलडाणा : पोलीस उपनिरीक्षकांची संख्या ११९ हवी असताना प्रत्यक्षात ३३ पोलीस उपनिरीक्षक जिल्ह्यात कमी आहेत. पोलीस निरीक्षकांचीही संख्या जिल्ह्यात कमी आहे. त्यामुळे नियमित कामांव्यतिरिक्त अन्य कामे सांभाळताना कर्मचाऱ्यांवर ताण येतो.

जि.प.शाळेतील प्रसाधनगृहांची दुरवस्था

बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक गावांतील जि. प. शाळांमधील प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. काेराेनामुळे शाळा बंद हाेत्या. काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा बंद असताना प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे.

शेत रस्त्यावरील पुलाचा प्रश्न लागला मार्गी

बुलडाणा : लोणार तालुक्यातील कारेगाव येथील शेत रस्त्यावरील पूल बांधकामासाठी मदतीचे हात सरसावले आहेत. मुळे अण्णा यांनी १ लाख ११ हजार रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे या शेत रस्त्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Web Title: Withdraw petrol-diesel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.