आरटीपीसीआर चाचणीशिवाय जि. प.मध्ये प्रवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:49+5:302021-04-13T04:32:49+5:30
--रॅपिड टेस्ट कॅम्पमध्ये ५ टक्के पॉझिटिव्ह-- गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच येणाऱ्या अभ्यागतांची रॅपिड टेस्ट करण्यात ...
--रॅपिड टेस्ट कॅम्पमध्ये ५ टक्के पॉझिटिव्ह--
गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच येणाऱ्या अभ्यागतांची रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. त्यात जवळपास ५ टक्के अभ्यागत कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यावरून एकंदरीत परिस्थितीचे गांभीर्य पाहता अत्यावश्यक व तातडीच्या कामासाठी येणाऱ्यांना किमान ४८ तास अगोदरचा आरटीपीसीआर टेस्टचा निगेटिव्ह अहवाल असलेल्या अभ्यागतांनाच अहवाल बघून कार्यालयात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. १० एप्रिलपासून या निर्णयाची जिल्हा परिषद प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे.
--ऑनलाईन कामावर जोर--
जिल्हा परिषदेमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कामात व्यत्यय येणार नाही. ते काम रखडणार नाही यासाठी ऑनलाईन कामावर जोर देण्यात येत आहे. त्यादृष्टीने जिल्हा परिषदेअंतर्गतच्या सर्व विभागांचे ई-मेल आयडी आणि संबंधित विभागाचा दूरध्वनी तथा तेथील कर्मचाऱ्यांचा मोबाईल नंबरही जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच माहितीस्तव लावण्यात येत असल्याची माहितीही अस्वार यांनी दिली.
-- ब्रेक द चेनसाठी महत्त्वाचे--
कोराेनाची साखळी तोडण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिआवश्यक कामासाठीच चाचणी करून संबंधित अभ्यागतांनी कार्यालयात यावे. प्रत्येकाचा जीव हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे या निर्णयास नकारात्मक न घेता सकारात्मक घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंदिरा अस्वार यांनी केले आहे.