महिलेने मागितली इच्छामरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:25 AM2021-06-05T04:25:09+5:302021-06-05T04:25:09+5:30

लोणार तालुक्यात १३ पॉझिटिव्ह लोणार : तालुक्यात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शुक्रवारी सापडले आहेत. त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये भरती ...

The woman asked permission for euthanasia | महिलेने मागितली इच्छामरणाची परवानगी

महिलेने मागितली इच्छामरणाची परवानगी

Next

लोणार तालुक्यात १३ पॉझिटिव्ह

लोणार : तालुक्यात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शुक्रवारी सापडले आहेत. त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे; तर काही रुग्णांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू करण्यात आले आहेत.

बदलत्या हवामानाचा फटका

बुलडाणा : नागरिकांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. कधी ढगाळ वातावरण, तर कधी ऊन पडत आहे. हे बदलते हवामान रोगराईसाठी आमंत्रण देणारे ठरत आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत असल्याचे दिसून येते.

ग्रामपंचायतीला सापडेना नालेसफाईचा मुहूर्त

मेहकर : तालुक्याच्या गावातील तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यास ग्रामपंचायतीला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येते. बोटांवर मोजण्याइतक्याच ग्रामपंचायतींकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, उर्वरित सफाईची कामे केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कपाशीचे लागवड क्षेत्र वाढणार

सिंदखेड राजा : एकेकाळी ‘कॉटन बेल्ट’ म्हणून ओळख असलेल्या वऱ्हाडात कापसाची सातत्याने सरासरीपेक्षा लागवड कमी होत आहे. यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यात कापसाची लागवड घटलेली होती; परंतु मागील वर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना फटका दिल्याने यंदा सिंदखेड राजा तालुक्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

नक्कल विभागाला संगणकीकरणाची गरज

बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक तहसील कार्यालयांत नक्कल विभागात सुविधांचा अभाव आहे. शेतजमिनीचे फेरफार, कोतवाल बुकाची प्रत मिळविण्यासाठी जाणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना या विभागात इंग्रज काळापासून असलेली दप्तरी नोंद जीर्ण झालेली आहे. या संपूर्ण मालमत्तेच्या कागदपत्राची संगणकीकृत नोंद होणे आवश्यक आहे.

शहर स्वच्छतेसाठी पालिका सरसावली

लोणार : शहरातील स्वच्छतेसाठी पालिका कर्मचारी सरसावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अंतर्गत स्वच्छता कमालीची ढासळली होती. कचरा, नालेसफाई, सांडपाण्याची विल्हेवाट यांवर लक्ष देण्यात येणार आहे.

पाणीबचतीचे संदेश लक्षवेधी

सिंदखेड राजा : सध्या तालुक्यातील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कित्येक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे. जनजागृतीसाठी प्रशासनातर्फे देण्यात येणारे पाणीबचतीचे संदेश लक्ष वेधणारे ठरत आहेत. परिसरातील ग्रामपंचायत, शाळा-महाविद्यालये अशा अनेक ठिकाणी पाणीबचतीचे संदेश लावण्यात आलेले आहेत.

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त

देऊळगाव मही : काही ठिकाणी विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विद्युत पुरवठ्याचा कमी-अधिक दाब होत असल्याने विद्युत उपकरणे धोक्यात आले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या गर्तेत

बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे विविध समस्यांच्या गर्तेत सापडत आहेत. रुग्णांकरिता विविध सुविधांचा अभाव असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य केंद्रात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांतील स्वच्छतेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

नदी खोलीकरण कामाला कोरोनाचा फटका

धामणगाव बढे : मागील वर्षी टाकळी शिराळ येथे भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे राबविल्या जात असलेल्या सुजलाम‌् सुफलाम‌् प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद सिंचन यांच्या कार्यक्षेत्रातील नदी खोलीकरण करण्यात आले होते. परंतु यंदा नदी खोलीकरणाच्या कामाला कोरोनाचा फटका बसला आहे.

अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्यांचा अभाव

अमडापूर : ग्रामीण भागातील लहान बालकांसाठी शासनाने बालविकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. मात्र अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत अंगणवाड्यातील पोषण आहाराचे धान्य ठेवायचे, कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी

सुलतानपूर : शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस पडेपर्यंत पेरणी करण्याची घाई करू नये. बियाण्याला शिफारशीनुसार बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. जेणेकरून पीक जोमदार वाढीस लागेल, असे मत शेतीशाळा तज्ज्ञांकडून व्यक्त केले. कृषी विभागाकडून गावोगावी खरीपपूर्व नियोजनाच्या ऑनलाइन सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा करणारे टँकर गायब

बुलडाणा : हंडाभर पाण्यासाठी लहान मुले व महिलांना वणवण भटकावे लागत आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकर सुरू केले आहेत; परंतु काही ठिकाणी पाणीपुरवठा करणारे टँकर कमी खेपा मारत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणारे टँकर गायब कसे होतात, असा प्रश्न नागरिकांना पडतो.

Web Title: The woman asked permission for euthanasia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.