बुलडाणा जिल्ह्यात महिलेचा मृत्यू, ३६ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 03:12 PM2020-11-21T15:12:45+5:302020-11-21T15:12:55+5:30
Buldhana CoronaVirus News मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील ६३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात शुक्रवारी तपासण्यात आलेल्या १,१७६ संदिग्धांच्या अहवालापैकी ३६ जण कोरोना बाधीत आढळून आले तर मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील ६३ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १३४ वर पोहोचली आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीतांची संख्या १०, ६९८ झाली असून त्यापैकी १०,१४८ बाधीतांनी कोरोनावर मात केली आहे.
शुक्रवारी पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये खामगाव तीन, सिंदखेड राजा दोन, बुलडाणा दोन, नांदुरा एक, देऊळगाव राजा तीन, मोताला दोन, जळगाव जामोद चार, लोणार एक, मलकापूर दोन, सेगाव पाच, आसलगाव एक, भेंडवळ एक, खेर्डा बुद्रू एक, माळेगाव गोंड तीन, मेहकर एक, भोसा एक, कळमेश्व एक, चायगाव एक, आणि अकोला जिल्ह्यातील वाटेगाव येथील एकाचा यात समावेश आहे. दरम्यान मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील ६३ वर्षीय महिलेचा २० नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे शुक्रवारी ४० जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामध्ये मलकापूर तीन, चिखली दोन, शेगाव चार, बुलडाणा एक, खामगाव पाच, नांदुरा चार, मेहर एक, सि. राजा सहा, जळगाव जामोद आठ आणि देऊळगाव राजा कोवीड केअर सेंटरमधील सहा जणांचा समावेश आहे.