बुलडाणा जिल्ह्यात महिलेचा मृत्यू, आणखी ११८ काेराेना पाॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:53 AM2021-03-02T11:53:48+5:302021-03-02T11:53:57+5:30
CoronaVirus in Buldhana डाेंगरखंडाळा येथील ७७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून डाेंगरखंडाळा येथील ७७ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच साेमवारी आणखी ११८ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच २८८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच ४३७ अहवाल काेराेना निगेटिव्ह आले आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५५५ अहवाल प्राप्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मेहरातील दाेन, मेहकर तालुका हिवरा आश्रम १, चिखली शहरातील ५, चिखली तालुका शेलूद १, मलकापूर शहर २४, मलकापूर तालुका वरखेड १, जांभूळधाबा १, शेगाव तालुका जवळा १, शेगाव शहर ६, शेगाव तालुका वरखेड १, मनसगाव १, खामगाव शहरातील १७, खामगाव तालुका : सुटाळा बु १, घाटपुरी १, बुलडाणा शहर २१, बुलडाणा तालुका सुंदरखेड २, रायपूर १, वरवंड १, मढ १, डोंगरखंडाळा १, म्हसला १, मोताळा तालुका गोतमारा १, दे. राजा शहर ४, दे. राजा तालुका पोखरी १, दे. मही १, लोणार शहर १, लोणार तालुका खंडाळा २, जळगाव जामोद शहर २, जळगाव जामोद तालुका खांडवी २, सिं. राजा शहर ९, मूळ पत्ता अंदुरा ता. बाळापूर जि. अकोला १, वडगाव वरुड जि. अमरावती १, मुक्ताईनगर जि. जळगाव येथील एकाचा समावेश आहे. तसेच काेराेनावर मात केल्याने खामगाव ४५, बुलडाणा अपंग विद्यालय ५६, स्त्री रुग्णालय १२, कोविड समर्पित रुग्णालय ६, नांदुरा १४, दे. राजा ७२ , लोणार ६, सिं. राजा : ६, चिखली ५४, जळगाव जामोद ८, मलकापूर येथील ९ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.
आज राेजी ९ हजार ३३५ नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १ लाख ३७ हजार २६९ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १८ हजार ७८६ कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी १६ हजार ६४ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली.