मलकापूरातील कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:25 AM2020-06-24T10:25:14+5:302020-06-24T10:25:23+5:30
सलग दोन दिवसात येथे दोन मृत्यू झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा:कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या मलकापूर शहरातील मोमीनपुरा भागातील एका ५५ वर्षीय कोरोना बाधीत महिलेचा २३ जुन रोजी मृत्यू झाला आहे. दरम्यान २२ जू न रोजीही येथील एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. सलग दोन दिवसात येथे दोन मृत्यू झाले आहेत.
दरम्यान, २३ जुलै रोजी एकूण २१ अहवाल आरोग्य विभागास प्रयोग शाळेतून प्राप्त झाले होते. त्यापैकी दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील एक मलकापूर येथील मृत पावलेल्या महिलेचा असून एक पॉझिटिव्ह रुग्ण नांदुऱ्यातील आहे. नांदुरा शहरातील हा पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत दहा कोरोना बाधीत व्यक्तींचा मृत्यू झाला असून एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या १६७ वर पोहोचली आहे. सध्या ३४ कोरोना बाधीतांवर उपचार करण्यात येत आहे. दुसरीकडे आतापर्यंत दोन हजार २७३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. १२२ कोरोना बाधीत व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. २३ जून रोजी २१ अहवाल अकोला प्रयोग शाळेतून प्राप्त झाले होते. ४४ अहवालांची अद्याप प्रतीक्षा आहे.