सोमठाण्यातील महिलेचा मृत्यू, १९९ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:05 AM2021-02-18T05:05:02+5:302021-02-18T05:05:02+5:30

बुलडाणा: कोरोना संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून बुधवारी तपासण्यात आलेल्या ६४० अहवालांपैकी तब्बल १९९ जण ...

Woman dies in Somthana, 199 positive | सोमठाण्यातील महिलेचा मृत्यू, १९९ जण पॉझिटिव्ह

सोमठाण्यातील महिलेचा मृत्यू, १९९ जण पॉझिटिव्ह

Next

बुलडाणा: कोरोना संसर्गाची दुसरी लाट जिल्ह्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून बुधवारी तपासण्यात आलेल्या ६४० अहवालांपैकी तब्बल १९९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. दरम्यान चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील वृद्ध महिलेचा कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा २२, गिरडा एक, सागवन एक, डोंगरसेवली एक, चांडोळ एक, कोलवड एक, येळगाव दोन, मलकापूर १६, देऊळगाव राजा २१, दगडवाडी एक, अकोला देव एक, सिनगाव जहागीर १३, आळंद एक, पिंपळनेर दोन, अंढेरा एक, सरंबा एक, डोढ्रा एक, जळगाव जामोद दोन, आसलगाव दोन, झाडेगाव एक, पळशी झाशी एक, एकलारा एक, सि. राजा दोन, रुम्हणा दोन, चिखली ३२, अंत्री कोळी एक, अमडापूर तीन, पेठ एक, खैरव दो, दहीगाव ेक, सवणा दोन, अंचरवाडी तीन, तेल्हारा एक, नायगाग एक, खंडाळा मकरध्वज एक, मंगरुळ नवघेर एक, धोत्रा भनगोजी एक, हातणी एक, केळवद एक, मेरा बुद्रूक एक, खामगाव १९, लाखनवाडा एक, टेंभुर्णा एक, घाटपुरी दोन, घानेगाव एक, कदमापूर तीन, सुटाळा खुर्द एक, तळणी एक, माकोडी एक, मेहकर दोन, शेगाव आठ, गायगाव दोन, आडसूळ एक, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील तीन, बाळापूर तालुक्यातील डोंगरगांव येथील एक, जालना जिल्ह्यातील जाळीचा देव येथील एकाचा बाधितांमध्ये समावेश आहे. दरम्यान चिखली तालुक्यातील सोमठाणा येथील ८७ वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतकांची संख्या आता १७९ झाली आहे.

दुसरीकडे ४२ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामध्ये चिखली येथील ११, देऊळगाव राजा येथील ९, बुलडाणा १८ सिंदखेड राजा कोवीड केअर सेंटरमधील चार जणांचा यात समावेश आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी १,१६,३९२ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच १४ हजार २६३ जणांनी कोरोनावर मात केलेली आहे.

--११४५ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा--

तपासणी करण्यात आलेल्या १,१४५ जणांच्या अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. आतापर्यंत १५ हजार २२५ जण जिल्ह्यात कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ७८३ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत १७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Woman dies in Somthana, 199 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.