अपघातात नवरदेव-नवरी गंभीर; रेल्वेच्या धडकेत एक युवती ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:43 AM2017-11-25T01:43:10+5:302017-11-25T01:49:30+5:30
मलकापूर : अकोला येथून विवाह सोहळा आटोपून मलकापूरकडे परतणार्या नवरदेवाच्या गाडीला शुक्रवारी रात्री अपघात झाला. त्यात नवरदेव-नवरी गंभीर जखमी झाले. तर दुसर्या घटनेत शनिवारी पहाटे तालु्क्यातील बहापुरा येथे रेल्वे रुळ ओलांडताना एक युवती ठार तर तिची चुलत बहीण जखमी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : अकोला येथून विवाह सोहळा आटोपून मलकापूरकडे परतणार्या नवरदेवाच्या गाडीला शुक्रवारी रात्री अपघात झाला. त्यात नवरदेव-नवरी गंभीर जखमी झाले. तर दुसर्या घटनेत शनिवारी पहाटे तालु्क्यातील बहापुरा येथे रेल्वे रुळ ओलांडताना एक युवती ठार तर तिची चुलत बहीण जखमी झाली.
मलकापुरातील शिवाजी नगर भागातील रहिवाशी तथा पालिका कर्मचारी सदाशिव तायडे यांचा मुलगा दीपक याचा विवाह अकोला येथील जठार पेठमध्ये राहणारे बळवंतराव आपोतीकर यांची कन्या रेणू हिच्याशी २३ नोव्हेंबरला पार पडला.
विवाहाचे सोपस्कार आटोपून नवरदेव नवरी स्वीफ्ट डिझायर या गाडीने मलकापूरकडे निघाले. पहाटे १.२0 वाजेच्या सुमारास अकोल्यावरून मलका पूरकडे येत असताना विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव वेगातील टाटा इंडिका (क्र.एम.एच.३0 एल.७७१४ ) स्वीफ्ट डिझायर गाडीवर चालकाच्या बाजूने जोरदार आदळली.
यामध्ये दीपकच्या नाकावर आणि रेणूच्या शरीराला जबर मार लागला. त्यामुळे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
यावेळीे नाशिक पोलिसांची गाडी जात होती. त्यातील कर्मचार्यांनी वाहनातील नवरेदव-नवरीला अकोला येथील सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दीपक आणि रेणू हे दोघेही जखमी झाल्याने २४ नोव्हेंबरचा स्वागत समारंभही रद्द करण्यात आला.
रेल्वेच्या धडकेत एक युवती ठार, दुसरी जखमी
बहापुरा : येथील राणी सदाशिव शितोळे (वय १७) व कोमल गजानन शितोळे (वय १६) या चुलत बहिणी शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास रेल्वे रुळ ओलांडत होत्या. एक गाडी थोड्या अंतरावर असल्याने रेल्वे रुळ ओलांडला; मात्र पाठीमागून दुसरी गाडी भरधाव आल्याने दोन्ही बहिणी या दोन गाड्यांच्या मध्ये सापडल्या. त्यात जोराची हवा आल्याने डाव्या कानाच्या बाजुने जबर फटका बसल्याने कोमल गजानन शितोळे खाली गिट्टीवर रक्ताच्या थारोळ्यात पडली तर दुसरीदेखील खाली पडल्याने राणी सदाशिव शितोळे हिच्या पाठीवर जबरदस्त मार लागला. घटनास्थळी पोहोचून रामराव शितोळे, नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ, गजानन ठोसर तथा इतरांनी दोघींना मलकापूर येथे उपचारार्थ हलविले. डोक्याला मार लागल्याने कोमल शितोळे हिला बुलडाणा येथे हलविण्यात आले; मात्र वाटेतच तिची प्राणज्योत मावळली. तर पाठीला गंभीर मार लागून पोटात रक्ताच्या गाठी तयार झाल्याने कोलते हॉस्पिटलमध्ये डॉ. अरविंद कोलते यांनी तिच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया केली. घटनेची वार्ता कळ ताच जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेंद्र वाडेकर, मनोहर खराडे आदींसह अनेकांनी कोलते हॉस्पिटल गाठले व शितोळे परिवाराला धीर दिला. जखमी राणीची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉ. अरविंद कोलते यांनी सांगितले आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भातनाते करीत आहेत.