मलकापूरच्या महिलेला बुऱ्हाणपूरमध्ये कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 03:42 PM2020-04-22T15:42:28+5:302020-04-22T15:43:25+5:30
मलकापूरच्या महिलेला बुऱ्हाणपूरमध्ये कोरोनाची लागण झाली आहे.
मलकापूरः मध्य प्रदेशातील बुरहानपूरात पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण मंगळवारी आढळून आला आहे. ती ५० वर्षीय महिला मलकापूरातील रहीवाशी असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली असून शहरावरील कोरोनाची गडद छाया कायम असल्याचे स्पष्ट होते. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मध्य प्रदेशातील बुरहानपूरात मंगळवारी पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे. विशेष म्हणजे तो रुग्ण ५० वर्षीय अल्पसंख्याक समाजातील महिला असून मलकापूरातील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले. ही ५० वर्षीय महिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. कोरोना संशयित म्हणून त्यांच्या तपासणी करण्यात आल्या. मंगळवारी त्यांचा अहवाल कोरोना पाँझीटीव्ह आल्याने बुरहानपूरात एकच खळबळ उडाली. महिला मलकापूरातील रहीवाशी असल्याने येथील कोरोनाची छाया अजूनही गडद असल्याचे स्पष्ट होते. यासंदर्भात बुरहानपूर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बुधवारी बोलावली. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनावर त्यात चर्चा झाली.