‘हगणदरीमुक्ती’साठी सावित्रीच्या लेकी रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:16 AM2017-11-15T01:16:14+5:302017-11-15T01:16:31+5:30
तालुक्यातील तळणी येथे ‘स्वच्छ तळणी, सुंदर तळणी’ चा गजर करीत सरपंच आशा नारखेडे यांच्या नेतृत्वात तळणी गावातील महिलांनी मंगळवारी गावा तून रॅली काढून हगणदरीमुक्तीचा संदेश दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : तालुक्यातील तळणी येथे ‘स्वच्छ तळणी, सुंदर तळणी’ चा गजर करीत सरपंच आशा नारखेडे यांच्या नेतृत्वात तळणी गावातील महिलांनी मंगळवारी गावा तून रॅली काढून हगणदरीमुक्तीचा संदेश दिला.
‘मातृभूमी-तळणी’ या नावाने व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ आता विस्तारित रूप घेत असून, ग्राम विकासात येणार्या अडचणी दूर करण्याकरि ता तालुका व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याची गरज गावकर्यांनी व्यक्त केली आहे. ज्या लोकांकडे शौचालय बांधायला जागा नाही, जे गावात राहतात; पण त्यांच्याकडे ८ अ नाही, ज्यांना आजपासून २0 वर्षांपूर्वी म्हणजे सन १९९४ मध्ये संडास बांधून मिळाला होता, त्यांचे आता शौचालय खराब झाले असून, त्यांना शासन मदत करीत नाही. संडास बांधायचा आहे, अनुदानही मिळणार आहे; पण सुरुवातीला पैसे नाही त, त्यामुळे आम्ही खड्डा करून देतो, शासनाने संडास बांधून द्यावेत, अशा विविध समस्या व पर्याय प्रत्यक्षात येण्यासाठी आता प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्याला गावकर्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृषी विकास संस्थेचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे यांनी केले. तळणी येथे दिवाळीनंतर तळणी गावामध्ये अनेक लोकांनी शौचालय बांधकामास सुरुवात केली आहे, तर काही कुटुंबांनी शौचालय वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फरक निदर्शनास येत आहे. आता कुटुंबनिहाय यादी तयार करण्यात येत असून, त्या कुटुंबाच्या अडचणी समजून घेऊन त्यावर काय पर्याय काढता येईल, याबाबत गावकरी विचार करीत आहेत. रॅलीच्या शेवटी स्वच्छता या प्रोजेक्टरच्या माध्यमा तून विषयावर सिनेमा दाखविण्यात आला व लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी वि. रा. खर्चे व प्रदीप नाफडे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले.