महिला सुरक्षीत नाही

By admin | Published: November 14, 2014 11:20 PM2014-11-14T23:20:45+5:302014-11-14T23:20:45+5:30

बुलडाणा जिल्ह्यात दिड महिन्यात १९ गुन्हे, विनयभंग व बलात्काराच्या घटनेत वाढ.

Women are not safe | महिला सुरक्षीत नाही

महिला सुरक्षीत नाही

Next

नीलेश शहाकार/ बुलडाणा

       जिल्ह्यात महिला सुरक्षीत नाही हे अलीकडेच घडलेल्या विविध घटनांवरुन स्पष्ट झाले आहे. गेल्या दिड महिन्यापासून जिल्ह्यात विनयभंग आणि बलात्कारासारख्या सामाजाला काळीमा फासणार्‍या १९ घटना घडल्या आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदे होऊनही अत्याचार थांबत नाहीत, ही चिंताजनक बाब आहे. कायद्याचा कोणालाही धाक राहिलेला नाही. यामुळे स्त्रींच्या अस्मितेवर घाव घालण्यापर्यत नराधमांची मज्जल वाढली आहे. गेल्या ४५ दिवसात जिल्ह्यात विनयभंग आणि बलात्कारासारख्या घटनांचा आलेख वाढता आहे. यात १६ विनयभंग आणि ३ बलात्काराच्या घटनांनी समाजमन ढवळून निघाले आहे. प्रशासनातील सर्वच उच्चपदावर महिला विराजमान आहे. तरी बुलडाणा शहरात महिला असुरक्षित असल्याचे चित्र आहे. वाढलेले विनयभंग आणि बलात्काराच्या घटनांमुळे ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली असुन महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेबाबत सर्वच स्तरावर चिंता व्यक्त केली जात असतानाही प्रत्यक्षात तशी समाज व्यवस्था निर्माण होत नसल्याचे शल्य अनेकांनी बोलुन दाखविले.

 *तंत्रज्ञानाच्या बळी

      ऑक्टोबर महिन्यात १२ विनयभंगाच्या घटना पुढे आल्या. यात खामगाव शहरात तर दोन घटनेमध्ये विनयभंग करुन व्हॉटस्अपवर चित्रिकरण अपलोड करण्यात आली. तर जळगाव जा. तालुक्यात आकोट-सुनगाव मार्गावर धावत्या बसमध्ये विद्यार्थीनीचा विनयभंग झाला. विशेष म्हणजे विनयभंगाच्या प्रकाराला नवविवाहीता व विद्यार्थींंनीच जास्त बळी पडल्या.

*नात्यांनाही फासला काळीमा

       नोव्हेंबर महिन्याच्या एका घटनेने समाजमनावर मोठा आघात झाला. सिं.राजा तालुक्यातील पोपळ शिवणी गावात चक्क चुलत काकासह जन्मदात्या बापाने पोटच्या मुलीवर बलात्कार केला. यात मुलीची आईने सहकार्य करुन मातृत्व कलंकीत केले. तर खामगाव शहरात नवविवाहीतेवर बलात्कार आणि तीची मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्य विक्री झाल्याचा प्रकार उघडकीस आला.

Web Title: Women are not safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.