महिलांचा ग्राम पंचायतवर हल्लाबोल; कार्यालयातील सामानाची नासधूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:27 PM2019-01-05T13:27:44+5:302019-01-05T13:28:07+5:30
सिंदखेडराजा: सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक सरपंच व ग्रामसेवक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. गावातील महिला व पुरुषांनी त्यांच्याविरोधात नारेबाजी केली.
सिंदखेडराजा: सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक सरपंच व ग्रामसेवक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. गावातील महिला व पुरुषांनी त्यांच्याविरोधात नारेबाजी केली. संतप्त महिलांनी शनिवारी सकाळी दगडफेक करीत कार्यालयातील सामानाची नासधूस केली. गोरेगाव येथे २५ वर्षापूर्वी सावंगी माळी धरणावरुन जलशुध्दी केंद्रासह ७० लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. कामही पुर्ण झाले. पण गावात पाणी पोहचलेच नाही. याला तत्कालीन प्रशासन जबाबदार धरल्या जात असतांना दोन वेळा त्याच नळयोजनेच्या दुरूस्तीवर खर्चही करण्यात आला. पण उपयोग झाला नाही. त्यानंतर गावालगत नाल्याजवळ विहीर घेण्यात आली. तिही फेल ठरली. त्यानंतर माजी सरपंच रामदास पंचाळ यांच्या शेतात एक विहीर घेण्यात आली. त्यावरुनही पाणीपुरवठा करण्यास ग्राम पंचायत प्रशासन अपयशी ठरले. गेल्या २५ वर्षापासून पाणी असतानाही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी एक कोटीची योजना पुन्हा मंजूर केली. त्या योजनेचे काम कासवगतीने सुरु आहे. जलवाहिनीचे काम पुर्ण झाले. राजेगाव येथील तलावावरुन पाणी सरळ विहीरीत सोडल्या जात आहे. मात्र ते पाणी दुषीत असल्याचा आरोप माजी उपसरपंच पठाण यांनी केला. ते पाणीही पंधरा दिवसातून एकवेळा गावात सोडल्या जाते. त्यामूळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या कित्येक महिन्यापासून गोरेगाव ग्रामपंचायत बंद होती. दरम्यान ५ जानेवारी रोजी सकाळी ग्रामपंचायत कार्यालय महिलांना उघडे दिसले. सचिव मनोज मोरे आणि संजय पंचाळ कार्यालयात उपस्थित होते. महिलांच्या ही बाब लक्षात येतात दीडशेहून अधिक महिला ग्राम पंचायतीवर मोर्चा घेवून आल्या. यावेळी बाचाबाची झाली. त्यात दगडफेकही झाली. तर काहींनी आपला राग कार्यालयातील सामानावर काढून नासधूस केली. या घटनेची तक्रार देण्यासाठी सचिव मनोज मोरे पोलीस स्टेशनमध्ये गेले असल्याची माहिती मिळाली.