महिलांनी दुधाने आंघोळ करून केला सरकारचा निषेध!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2017 12:51 AM2017-06-03T00:51:07+5:302017-06-03T00:51:07+5:30
मोताळा: संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात १ जूनपासून शेतकरी संपावर असून, दुसऱ्या दिवशी शेतकरी संपाचे पडसाद मोताळा तालुक्यातही उमटले.
मोताळा: संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरात १ जूनपासून शेतकरी संपावर असून, दुसऱ्या दिवशी शेतकरी संपाचे पडसाद मोताळा तालुक्यातही उमटले. खरबडी गावात शेतकरी महिलांनी दुधाने आंघोळ घालून तर आडविहीर गावात रस्त्यावर दूध ओतून शेतकरी संपाला पाठिंबा देण्यात आला.
सरकारकडून संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांची घोषणा होत नसल्याने बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यभरातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्या दिवशी मोताळा तालुक्यात संपाबाबत अनभिज्ञता दिसून आली; मात्र शुक्रवारी तालुक्यातील खरबडी गावात सकाळी दूध उत्पादक शेतकरी व महिला एकत्र जमा झाले. यावेळी सरपंच मयूर किनगे, पांडुरंग किनगे, दगडाबाई वाकोडे, निर्मल सोळंके, शोभा किनगे, आशाबाई वाकोडे, उषा निकाळजे, रंजना किनगे, नवलसिंग सोळंके, नितीन राणे, विजय किनगे, राजेंद्र पाटील, भीमराव इंगळे, श्रीकृष्ण किनगेंसह मोठया संख्येत उपस्थित महिला व पुरूष शेतकऱ्यांनी शेकडो लिटर दूध रस्त्यावर फेकून दिले, तर महिलांनी दुधाने आंघोळ करून शासनाप्रति आपला रोष व्यक्त करत शेतकरी संपाला पाठिंबा दिला. आडविहिरी गावातील दूध उत्पादकांसह अन्य शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी मोताळा-नांदुरा मार्गावर येऊन हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून शेतकरी संपाला पाठिंबा दिला. यावेळी राजेंद्र पाटील, हरिभाऊ खर्चे, ओंकार कोलते, एकनाथ खर्चे, सुरेश जावळे, सुनील खर्चे, पुरूषोत्तम नाफडे, किशोर खर्चे, शंकर सोनुने, नितीन खर्चे, चंद्रकांत बंडे, छगन साबे, रमेश फाटे, राहुल जावळे, अंकु श बंडे, नीलेश सपकाळ आदी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.