पायाभूत सुविधांसाठी महिलांची खामगाव पालिकेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 03:38 PM2020-02-05T15:38:32+5:302020-02-05T15:38:41+5:30
गजानन कॉलनी परिसरात गत काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक गजानन कॉलनीतील पाणीटंचाई तात्काळ निकाली काढण्यात येवून परिसरात पायाभूत सुविधा द्याव्यात, या मागणीसाठी मंगळवारी महिलांनी खामगाव पालिकेवर धडक दिली.
शहरातील गजानन कॉलनी परिसरात गत काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सोबतच या परिसरात मुलभूत समस्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पायाभूत सविधा मिळत नसल्याने या भागातील महिला त्रस्त झाल्या आहेत. पालिकेकडून या भागात सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. तीन वर्षापासून पाणीटंचाईचा प्रश्न येथे भेडसावत आहे.
मात्र त्यावरही तोडगा अद्याप काढण्यात आलेला नाही, त्यामुळे मंगळवारी नगर पालिकेत धाव घेतली. सुरूवातीला पाणी पुरवठा विभागात या महिला धडकल्या. त्यानंतर संतप्त महिलांनी मुख्याधिकाऱ्यांकडे आपले ग्राºहाणे मांडले. यावेळी सविता वाकोडे, इंदुबाई इंगळे, कांचन सुरडकर, रंजना तिडके, कल्पना गवई, वनिता तायडे, उषा सावदेकर, वर्षा शामदे, अलका गायकवाड, पुष्पा धांदरे, सविता राजगुरू यांच्यासह अन्य महिलांचा यामध्ये समावेश होता. या भागात सुविधा देण्याची महिलांची मागणी आहे. (प्रतिनिधी)