दारूमुक्तीसाठी महिलांची एकजूट आवश्यक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:01 AM2017-09-16T00:01:50+5:302017-09-16T00:02:19+5:30
मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला दारूमुक्त करण्यासाठी महिला शक्तीने संघटित होण्याची गरज आहे. जर महिलांनी निर्धार केला आणि त्याला राजकीय पाठबळ मिळाले तर दारू हद्दपार हरेण्यास थोडाही वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी येथे व्यक्त केले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे १५ स प्टेंबर रोजी आयोजित बुलडाणा जिल्हा दारूमुक्त निर्धार परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्याला दारूमुक्त करण्यासाठी महिला शक्तीने संघटित होण्याची गरज आहे. जर महिलांनी निर्धार केला आणि त्याला राजकीय पाठबळ मिळाले तर दारू हद्दपार हरेण्यास थोडाही वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी येथे व्यक्त केले. हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठानतर्फे १५ स प्टेंबर रोजी आयोजित बुलडाणा जिल्हा दारूमुक्त निर्धार परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
येथील गर्दे हॉलमध्ये झालेल्या या परिषेदेच्या उद्घाटन सोहळ्यात आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. राहुल बोंद्रे, अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हिरकणीच्या संस्था पक अध्यक्ष अँड. वृषाली बोंद्रे मंचावर उपस्थित होत्या. या प्रसंगी दारू विकणार्या हातांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास दारूमुक्तीची पावले यशस्वीपणे मार्गक्रमित होतील, असा विश्वास आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला. चि खलीच्या माजी नगराध्यक्ष शोभा सवडतकर यांच्या हस्ते स त्यपाल महाराज यांचा सत्कार करण्यात आला. जि. प. सदस्य अँड. जयo्री शेळके, अस्तित्व महिला संघटनेच्या प्रेमलता सोनोने, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष ज्योती ढोकणे, संजय कोठारी, विवेक लोढे आदींची याप्रसंगी उपस्थिती हो ती.
प्रास्तविकातून दारूमुक्ती लढय़ाचा गोषवारा वृषाली बोंद्रे यांनी मांडला. त्या म्हणाल्या की, महिलांच्या उत्कर्षासाठी काम करीत असताना त्यांना दारूची समस्या हा सर्वात मोठा अडथळा असल्याचे जाणवले. कुटुंब उद्ध्वस्त करणारी दारू बंद करण्यासाठी लढा दिला पाहिजे. या निश्चयानेच दारूमुक्ती निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, यापुढे हा लढा व्यापक करण्यासाइी महिलांनी गावागावातून पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन रणजित राजपूत यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश वानखेडे यांनी केले.
-