महिलांनी केले पालिकेत ठिय्या आंदोलन
By Admin | Published: September 21, 2016 02:24 AM2016-09-21T02:24:55+5:302016-09-21T02:53:58+5:30
बुलडाणा येथील शासकीय निवासस्थानात घाणीचे साम्राज्य.
बुलडाणा, दि. २0 - येथील शासकीय निवासस्थान परिसरात सर्वत्र घाण पसरली आहे, पावसाळयाचे पाणी वाहून जाण्यासाठी नाली नसल्याने नाल्याचे पाणी घरासमोर साचत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहे. वारंवार तक्रारी करुनही दखल घेतली जात नसल्याने या इमारतीतील महिलांनी सोमवारी दुपारी पालिकेत ठिया आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा महिला कांग्रेस कमिटीच्या सरचिटणीस नंदिनी टारपे यांनी केले. या निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील अनेक भागातील नियमित साफसफाई करण्यासाठी कोणताही कर्मचारी येत नाही. अनेक वेळा हेल्पलाईन वर तक्रार करुनही कोणी दखल घेत नाही. संबंधित कार्यालयास भेट दिली असता तेथील कर्मचारी हा परिसर बांधकाम विभागाचा असल्याचे सांगतात. निवडणुकी दरम्यान पालिकेतील सर्वच उमेदवार या ठिकाणी मतदान मागण्यासाठी येतात मात्र काम सांगितले असता उडवा उडवीची उत्तरे देतात. या ठिकाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे, या घाणी मुळे रोगराई, आजार वाढू शक तो, लवकरच महालक्ष्मी, दसरा आदी सारखे सण आहेत त्यामुळे परिसरत तत्काळ साफ सफाई करण्यात यावी अशी मागणी येथील महिलांनी केली.
यावेळी पालिका प्रशासन विभागात उपस्थित देशपांडे यांनी आठ दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन महिलांना दिले. यावेळी जिल्हा महिला कांग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीस नंदिनी टारपे, पंचशिल खरात, संगीता बोराडे, अर्चना माठे, उषा जाधव, शितल जोशी, दुर्गा डाबेराव आदी उपस्थित होत्या.