‘त्या’ युवतींची सुधारगृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:12 AM2017-09-19T00:12:54+5:302017-09-19T00:12:54+5:30

खामगाव :   शेगाव शहरातील लॉजेसवर शनिवारी पोलिसांनी धाडी टाकून काही देह व्यापार करणार्‍या तर काही बेकायदा सोबत राहणार्‍या युवक- युवतींना ताब्यात घेतले होते. यामधील देहव्यापार करणार्‍या महिलेला न्यायालयाने जामिनावर सोडले होते, तर यातील दोन युवतींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही युवतींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.

The women will be reformed to the house | ‘त्या’ युवतींची सुधारगृहात रवानगी

‘त्या’ युवतींची सुधारगृहात रवानगी

Next
ठळक मुद्देशेगाव येथील लॉजमध्ये अनैतिक देह व्यापार प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :   शेगाव शहरातील लॉजेसवर शनिवारी पोलिसांनी धाडी टाकून काही देह व्यापार करणार्‍या तर काही बेकायदा सोबत राहणार्‍या युवक- युवतींना ताब्यात घेतले होते. यामधील देहव्यापार करणार्‍या महिलेला न्यायालयाने जामिनावर सोडले होते, तर यातील दोन युवतींना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता दोन्ही युवतींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली.
१६ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीला पोलिसांनी ८ लॉजेसवर छापे मारून अनैतिकरीत्या देहव्यापार करणार्‍या ५0 ते ६0 युवक व युवतींना पकडले. जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. शेगाव शहरातील लॉजेसमध्ये अनैतिक देह व्यापार होत असल्याची माहिती पोलिसांना खबर्‍याकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री शहरातील काही लॉजेसची झडती घेतली. झडतीमध्ये पोलिसांना २८ तरूण मुले व मुली अश्लील चाळे करताना आढळून आले. 
पोलिसांनी त्यांना पकडून त्यांची कसून चौकशी केली. त्यामधील २८ मुलांवर कलम ११0 व ११७ अंतर्गत कारवाई केली तर २५ ते ३0 मुलींना समजपत्र देऊन सोडून देण्यात आले. मंदिर परिसरातील गोपाल गेस्ट हाऊसवर पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गोपाल गेस्ट हाऊस येथे संजय मोहोड पाटील, गोपाल रमेश उमाळे रा.शेगाव हे चिखली येथील एका महिलेमार्फत मुलींना देहविक्रीचा व्यवसाय करण्यास लावून वेश्या व्यवसाय चालवित असल्याचे दिसून आले.
चिखली येथील मुलींचा पुरवठा करणारी एक ३४ वर्षाची महिला आढळून आली. तिला पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर ती पोपटासारखी बोलू लागली व शेगाव येथील संजय मोहोड पाटील, गोपाल रमेश उमाळे यांच्या मार्फत गोपाल गेस्ट हाऊस येथे देहविक्रीकरिता  मुली पुरविण्याचे काम करते, असे तिने सांगितले. तसेच चिखली येथील २३ वर्षाची मुलगी व निमकर्दा येथील २५ वर्षाची मुलगी या दोघींच्या सांगण्यावरून या गेस्ट हाऊसवर आणल्याचे तिने कबूल केले. या माहितीवरून पोलिसांनी रूम नं.१0४,१0५ ची झडती घेतली असता दोघींसोबतही दोन जण अश्लील चाळे करताना आढळून आले. यावरून लॉजमालकासह त्या महिलेविरुद्ध पिटा अंतर्गत कारवाई करून रविवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली. 
सोमवारी या प्रकरणातील दोन्ही युवतींना हजर केले असता, दोघींची न्यायालयाने बुलडाणा येथील महिला सुधारगृहात रवानगी केली. 

Web Title: The women will be reformed to the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.