दारूबंदीसाठी विद्यार्थिनींसह महिला सरसावल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:35 AM2017-09-07T00:35:05+5:302017-09-07T00:35:11+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार दारुची दुकाने गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे गावात शांतता होती. दरम्यान दारुची दुकाने पुन्हा सुरु होत असून, स्थानिक जुन्या बसस्थानकावरील दारुची दुकाने कायमची बंद करावी, या मागणीसाठी विद्या र्थीनींसह महिला सरसावल्या आहेत. ६ सप्टेबर रोजी उपविभागीय अधिकारी, पोलिस स्टेशन व नगर पालीका यांना सदर महिलांनी निवेदन दिले आहे. तर या ठिकाणावरची दारुची दुकाने बंद न झाल्यास यापुढे तीव स्वरुपाची आंदालने करण्याचा इशाराही या महिलांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : न्यायालयाच्या आदेशानुसार दारुची दुकाने गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. त्यामुळे गावात शांतता होती. दरम्यान दारुची दुकाने पुन्हा सुरु होत असून, स्थानिक जुन्या बसस्थानकावरील दारुची दुकाने कायमची बंद करावी, या मागणीसाठी विद्या र्थीनींसह महिला सरसावल्या आहेत. ६ सप्टेबर रोजी उपविभागीय अधिकारी, पोलिस स्टेशन व नगर पालीका यांना सदर महिलांनी निवेदन दिले आहे. तर या ठिकाणावरची दारुची दुकाने बंद न झाल्यास यापुढे तीव स्वरुपाची आंदालने करण्याचा इशाराही या महिलांनी दिला आहे.
दारुमुळे गरीबांचे संसार उध्वस्त होत आहेत. अनेक कुटूंब या दारुमुळे उघड्यावर आले आहेत. न्यायालयाच्या आदेशावरुन गेल्या काही महिन्या पासून दारुची दुकाने बंद होती. परंतु सदर दुकाने पुर्ववत सुरु होत असल्याने महिला वर्ग संतप्त झाला आहे. मेहकर शहरामध्ये भरवस्तीत संतोषीमाता नगर परिसरात अनेक दारुची दुकाने आहेत. या दारुच्या दुकानांमुळे विद्यार्थीनी, महिला यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. मुलींना शाळेत, शिकवणी वर्गाला तसेच महिलांना बाजारात जाण्यासाठी याच दारुच्या दुकानाजवळून जावे लागते. याठिकाणी अनेक लोक दारु पिवून अश्लील भाषेत बोलतात, अश्लिल कृत्ये करतात. तर अनेक वेळा याठिकाणी वाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हो तो. जिजामाता कन्या शाळा, जनता हायस्कूलला जा ताना याच रस्त्यावरुन जावे लागते. या दारुच्या दुकानाच्या अगदी जवळ मॉ संतोषी माता मंदिर, महादेव मंदिर, मारोती मंदिर, मदरसा, अशी धार्मिक स्थळ आहेत. त्यामुळे भाविकांना याचा त्रास होतो. सदर दुकाने कायमची बंद करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.
दारू दुकानांना न.प.ची ‘एनओसी’ देणार नाही - गवळी
न्यायालयाने सर्वच दारूची दुकाने बंद करण्यासाठी आदेश दिले होते, तर शहरात ५00 मीटरपर्यंत कोण त्याही दारूच्या दुकानांना न.प.ने परवानगी देऊ नये, अशा सूचना आहेत; परंतु जेव्हापासून दारूची दुकाने बंद झाली तेव्हापासून शहरात कोणतेही वादविवाद, भांडण, तंटे झाले नाहीत, शहरात शांतता आहे. दारूमुळे गरिबांचे संसार उद्ध्वस्त होतात. गरीब कुटुंब उघड्यावर येतात. त्यामुळे शहरातून दारू कायमची बंद झाली पाहिजे. यासाठी काँग्रेस, शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचा पाठिंबा आहे. दारू बंद झाली पाहिजे, हा एक चांगला विषय आहे. त्यामुळे न.प.कडून दारू दुकानांना एनओसी देणार नाही, अशी ग्वाही नगराध्यक्ष कामसभाई गवळी यांनी दिली. यावेळी मुख्याधिकारी अशोक सातपुते, शिवसेना गटनेते संजय जाधव, काँग्रेसचे गटनेते मो.अलीम मो.ताहेर, उपाध्यक्ष जयचंद बाठीया, अँड.अनंत वानखेडे, आरोग्य सभापती मनोज जाधव, शिक्षण सभापती रामेश्वर भिसे, पाणीपुरवठा सभापती ओम सौभागे, विकास जोशी, समाधान सास् ते, रविराज रहाटे, ललित इन्नाणी, राजेश अंभोरे, अलीयार खान आदी उपस्थित होते.