राम मंदिर निधी संकलनांतर्गत महिलांची बाईक रॅली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:30 AM2021-02-05T08:30:19+5:302021-02-05T08:30:19+5:30
चिखली : श्री राम मंदिर निर्माण निधी संकलन समर्पण अभियानांतर्गत २ फेब्रुवारी रोजी चिखली शहरातून महिलांनी दुचाकी काढण्यात आली. ...
चिखली : श्री राम मंदिर निर्माण निधी संकलन समर्पण अभियानांतर्गत २ फेब्रुवारी रोजी चिखली शहरातून महिलांनी दुचाकी काढण्यात आली.
अभियानप्रमुख डॉ. अर्चना अंबेकर यांच्या नेतृत्वात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत काढण्यात आलेल्या या रॅलीत भगवाधारी महिला व युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. राजा टॉवर परिसरात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी नगरसंघचालक शरद भाला यांनी मार्गदर्शन केले. रॅलीदरम्यान शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार श्वेता महाले यांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, जि.प. सदस्य सुनंदा शिनगारे, पं.स. सभापती सिंधू तायडे, सदस्य मनीषा सपकाळ, व्दारका भोसले, कांचना पाटील, सुनीता भालेराव, शारदा वायाळ, ज्योती भवर, विद्या जोशी, सुवर्णा पावडे, वैशाली फडणीस, मोनिका व्यवहारे, राजश्री देशपांडे, विद्या चव्हाण, निता कुळकर्णी, मनीषा बोंद्रे, ज्योती भावसार आदी उपस्थित होते. भगवान श्री रामांच्या महाआरतीचे सुश्राव्य गायन राजश्री देशपांडे यांनी केले. रजनी महाले हिने भारतमातेचा वेश परिधान करून रॅलीचे नेतृत्व केले.