गॅस दरवाढीविरोधात महिला काँग्रेसचे 'चूल पेटवा' आंदोलन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:37+5:302021-03-16T04:34:37+5:30
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. घरगुती इंधनाच्या गॅसचे भाव प्रचंड वाढल्यामुळे महिलांवर ...
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. घरगुती इंधनाच्या गॅसचे भाव प्रचंड वाढल्यामुळे महिलांवर आता गॅसऐवजी चूल पेटविण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट करून केंद्र सरकारच्या धोकेबाजीमुळे सर्वसामान्यांसह मजूर व गोरगरिबांसह सर्वांचेच बजेट कोलमडल्याने सरकारच्या धोरणांचा विरोध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, दरवाढीचा निषेध नोंदवत महिलांनी तहसील कार्यालयासमोर चुली पेटवून बेसन, भाकरी बनविली. सरकारविरोधात घोषणाबाजी केली. महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा व नगरसेविका संगीता गाडेकर यांच्या नेतृत्त्वात पार पडलेल्या या आंदोलनात शहराध्यक्षा विद्या देशमाने, नगरसेविका सुनीता शिंगणे, छाया खरात, अनिता घुबे, विजया गायकवाड, नेहा खरात, रूपाली येवले, शुभांगी गिरी आदींसह महिला काँग्रेसच्या सदस्यांचा सहभाग होता. यावेळी तालुका व शहर पदाधिकारी कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.