आत्मनिर्भर हाेण्याचा महिलांचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:40 AM2021-02-20T05:40:16+5:302021-02-20T05:40:16+5:30
धामणगाव बढे : गावातील महिला एकत्रित येऊन १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर महिला स्वालंबन ग्राम ...
धामणगाव बढे : गावातील महिला एकत्रित येऊन १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या मुहूर्तावर महिला स्वालंबन ग्राम विकास आघाडीची स्थापना करण्यात आली .तसेच महिलांनी एकत्र येत ग्रामपंचायत भवनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली. महिला विकास आघाडीच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच महिला व मुलींच्या प्रश्नावर काम करण्यासाठी तसेच महिलांसाठीच्या विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काम केले जाईल अशी माहिती यावेळी प्रियंका क्षिरसागर यांनी दिली . कार्यक्रमाला प्रमुख्याने कविता रामशंकर सोनोने , प्रियांका मुकुंदा क्षीरसागर, अनिता रमेश जाधव, संगीता सुरेश बढे, प्रतिभा महेंद्र लहासे, जयश्री दीपक दहिभाते, सुवर्णा गणेश हुडेकर, शीतल ज्ञानेश्वर आहेर, मंदाबाई घोरपडे, छाया मनोज गोरे, अनिता रणीत, सुवर्णा गजानन आहेर यांची उपस्थिती होती .यावेळी महिला ग्राम विकास आघाडीच्या माध्यमातून महिलांच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार महिलांनी केला.
यावेळी संगीता सुरेश बढे, प्रतिभा महेंद्र लहासे व छाया मनोज गोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन प्रियांका क्षीरसागर यांनी तर आभार सुवर्णा आहेर यांनी मानले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना उपस्थित महिला.