दारूबंदीसाठी महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
By admin | Published: May 10, 2017 01:14 PM2017-05-10T13:14:17+5:302017-05-10T13:14:17+5:30
ग्रामसभेमध्ये निवेदन देवूनही दारूबंदीचा ठराव सरपंच वग्रामसेवकांनी न घेतल्यामुळे सुलतानपूर येथील महिलांनी बुधवारी थेटजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
बुलडाणा : ग्रामसभेमध्ये निवेदन देवूनही दारूबंदीचा ठराव सरपंच व
ग्रामसेवकांनी न घेतल्यामुळे सुलतानपूर येथील महिलांनी बुधवारी थेट
जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना
निवेदन देण्यात आले.
सुलतानपूर गावात सर्रास अवैध दारूविक्री होत आहे. त्यामुळे अनेकांचे
संसार उद्धवस्त झाले असून, तरूण मुलेही व्यवसाच्या आहारी जात आहेत.
त्यामुळे गावात संपूर्ण दारूबंदी व्हावी, अशी मागणी महिलांनी केली.
तशाप्रकारचे निवेदनही सरपंचांना देण्यात आले. मात्र, त्यानंतरही गावात
दारूबंदी करण्यात आली नाही. ग्रामसभेमध्येही ठराव घेण्याकरिता सरपंचांना
आग्रह करण्यात आला. मात्र सरपंच व ग्रामसेवकांने ठराव घेण्यास टाळाटाळ
केली. त्यामुळे थेट महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. निवेदन
देतेवेळी स्वाती पनाड, किरण पनाड, अनिता पनाड, गयाबाई सरदार, रेखा पनाड,
इंदू पनाड यांच्यासह अनेक महिला होत्या.