कर्जाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: May 16, 2017 07:15 PM2017-05-16T19:15:39+5:302017-05-16T19:15:39+5:30
खामगाव : बचतगट तयार करुन प्रत्येकी १८०० रुपये भरा त्यानंतर ५० हजार रुपयांचे कर्ज देवू, अशी भूलथाप देणाऱ्या इंदोर येथील विजय सोनोने नामक इसमास महिलांनी पोलिसांच्या ताब्यात दिले.
ऑनलाइन लोकमत
खामगाव : बचतगट तयार करुन प्रत्येकी १८०० रुपये भरा त्यानंतर ५० हजार रुपयांचे कर्ज देवू, अशी भूलथाप देणाऱ्या इंदोर येथील विजय सोनोने नामक इसमास महिलांनी पकडून त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना १५ मे रोजी नांदुरा येथे घडली. नांदुरा येथील वार्ड क्रमांक ७ डॉ. आंबेडकर नगरमध्ये राहणाऱ्या महिलांच्या बचत गटास इंदोर येथील रुख्मीनी नगरमध्ये राहणाऱ्या विजय सोनोने प्रत्येकी १८०० रुपये दिल्यास ५० हजाराचे कर्ज देतो, असे आमिष दाखवित १० जणींचे १८ हजार रुपये जमा केले व महिलांना बँकेचे पासबुक व एटीएम कार्ड दिले. मात्र पैसे दिल्यानंतर कर्ज मिळेल की नाही याबाबत शंका आल्याने महिलांनी एटीएममधील रक्कम पाहण्याचा आग्रह धरला असता विजय सोनोने याने दुसऱ्या बचत गटाची नोंदणी करुन येतो असे म्हणून पसार होण्याचा प्रयत्न केला असता महिलांनी विजय सोनोने यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.