पीक विम्यासाठी महिलांचा पुढाकार
By ram.deshpande | Published: July 26, 2017 01:25 AM2017-07-26T01:25:17+5:302017-07-26T01:25:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवराआश्रम : मागील चार ते पाच वर्षांपासून सतत नापिकी, गारपीट, अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या सर्व बाबींपासून पिकाला संरक्षण मिळावे म्हणून प्रधानमंत्री पीक विमा योजना शासन स्तरावरून राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांसह त्यांच्या अर्धांगिनीही पीक विमा भरण्यासाठी पुढाकार घेत असून, मेहकर तालुक्यातील परतापूर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनीही मंगळवारी जनजागृती केली.
जिल्ह्यातील बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. पावसाने कृपा केली, तरच भरघोस उत्पादन मिळते. कधी अतिवृष्टीमुळे, अपुºया पावसामुळे, गारपिटीमुळे तर कधी रोगराईमुळे उत्पादनात घट होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीत शेतकºयांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०१७ राबविण्यात येत आहे. या योजनेत खरीप हंगामामध्ये ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कापूस आदी पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही योजना कर्जदार शेतकºयांना बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकºयांना ऐच्छिक स्वरूपाची आहे. पीक विमा योजनेमुळे शेतकºयांना पिकांचे संरक्षण मिळणार असल्यामुळे शेतकºयांना लाभ होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पीक विम्यामुळे शेतकºयांना काहीअंशी का होईना, दिलासा मिळत आहे.
ही बाब लक्षात घेऊन मेहकर तालुक्यात शेतकºयांनी पीक विमा भरण्यावर भर दिला असून, त्यामध्ये महिला शेतकºयांचा सहभाग वाढल्याचे दिसून येत आहे, तसेच प्रत्येक गावामध्ये कृषी विभागाच्यावतीने वार्ताफलक लावण्यात आलेले आहे. या फलकावर प्रधानमंत्री पीक विमा योजनेविषयी माहिती लिहिण्यात आली आहे.
पीक विम्याचे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. शेतकºयांनी बँकेत गर्दी टाळण्यासाठी पीक विमा मुदतीपूर्वीच भरायला हवा, तसेच अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- विजय सरोदे,तालुका कृषी अधिकारी, मेहकर.