सीएसआर अंतर्गत १४ गावांमध्ये कामे

By admin | Published: March 18, 2015 11:44 PM2015-03-18T23:44:43+5:302015-03-18T23:44:43+5:30

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये कामे सुरू.

Work in 14 villages under CSR | सीएसआर अंतर्गत १४ गावांमध्ये कामे

सीएसआर अंतर्गत १४ गावांमध्ये कामे

Next

बुलडाणा : कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सामाजिक उत्तरदायित्व कायदा अंतर्गत जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जलयुक्त शिवार अभियानाची बुधवारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ही माहिती जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी दिली. ह्यलोकमतह्णने १३ फेब्रुवारीच्या अंकात यासंदर्भात लक्ष वेधले होते, हे विशेष ! बैठकीला अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर, विभागीय कृषी सहसंचालक शु. रा. सरदार, उपायुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे, वनविभागाचे उपसंचालक धारणकर, लघुसिंचन विभागाचे देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हजारे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत जिल्ह्यात २ हजार ३८७ कामांचे नियोजन असून, अशा पद्धतीने नियोजन विभागातील अन्य जिल्ह्यांनी करण्याचेही आयुक्तांनी आदेशित केले. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी म्हणाल्या, या अंतर्गत १४ गावांमध्ये २३८७ कामांचे नियोजन करण्यात आले आहे. अभियानातंर्गत जिल्ह्यात निवडलेल्या ३३0 गावांपैकी ७७ गावांमध्ये २७८ कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामध्ये १२ ठिकाणी सिमेंट नाला बांध उभारण्यात येणार आहे. ४१ गावांमध्ये गतिमान पाणलोटकरिता ७९३.७८ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती कुरुंदकर यांनी दिली.

Web Title: Work in 14 villages under CSR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.