जिल्ह्यातील ४०० ग्रामपंचायतीमध्ये मजुरांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:34 AM2021-03-10T04:34:32+5:302021-03-10T04:34:32+5:30

सर्वांत कमी रोजगार असलेला तालुका जिल्ह्यात सर्वांत कमी रोजगार असलेला तालुका लोणार आहे. लोणार तालुक्यातील टीटवीसह अनेक गावातील कुटुंबच्या ...

Work in the hands of laborers in 400 gram panchayats of the district | जिल्ह्यातील ४०० ग्रामपंचायतीमध्ये मजुरांच्या हाताला काम

जिल्ह्यातील ४०० ग्रामपंचायतीमध्ये मजुरांच्या हाताला काम

googlenewsNext

सर्वांत कमी रोजगार असलेला तालुका

जिल्ह्यात सर्वांत कमी रोजगार असलेला तालुका लोणार आहे. लोणार तालुक्यातील टीटवीसह अनेक गावातील कुटुंबच्या कुटुंब परराज्यात कामासाठी जातात. या भागात कामे वाढविण्यात आली तरीही मजुरांचे स्थलांतर थांबत नाही. लोणार तालुक्यातील काही गावांतील जवळपास ८० ते ९० टक्के लोक हे कामासाठी बाहेरच्या जिल्ह्यात जात असल्याचे चित्र आहे.

मजुरांचे स्थलांतर सुरू

जिल्ह्यात रब्बी हंगामातील कामे संपली असतानाच रोजगाराची समस्या गंभीर बनत आहे. दरदिवशी विविध ठिकाणांहून शेकडो मजूर औरंगाबाद, मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्र प्रदेशसारख्या राज्यात रोजगारासाठी स्थलांतर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात सद्यस्थितीत वाढत असलेला कोरोना संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी रोहयोची कामे वाढवतानाच त्यांना या कामाबाबत मार्गदर्शनही करणे आवश्यक आहे.

काय म्हणतात मजूर...

मी बांधकाम कामगार आहे. मागील वर्षापासून बांधकामाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे बाहेर जाण्याशिवाय पर्याय नाही. जॉबकार्ड आहे, परंतु काम मिळत नाही, अशी माहिती एका मजुराने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. शेतीची कामे संपल्यानंतर आता रोजगाराची स्थिती गंभीर आहे. त्यात परिसरात रोहयोच्या कामांबाबत काही हालचाली दिसत नसल्याने मागणी करून फायदा होणार काय, असा विचार येतो. परिसरात रोहयोची कामे सुरू केल्यास हजारो जॉबकार्डधारकांना रोजगार मिळेल, अशी माहिती प्रभाकर इंगळे यांनी दिली.

रोहयोचा आराखडा

५८९२

एकूण मजूर

९९८

सध्या सुरू असलेली एकूण कामे

Web Title: Work in the hands of laborers in 400 gram panchayats of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.