राष्ट्रगीताने कामाला सुरुवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:16 AM2017-08-19T00:16:54+5:302017-08-19T00:17:18+5:30
मेहकर : पंचायत समितीच्या सभापती जया कैलास खंडारे यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्टपासून पंचायत समितीत राष्ट्रगीताला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने १८ ऑगस्ट रोजी आ.संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रगीत घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : पंचायत समितीच्या सभापती जया कैलास खंडारे यांच्या संकल्पनेतून १५ ऑगस्टपासून पंचायत समितीत राष्ट्रगीताला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने १८ ऑगस्ट रोजी आ.संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रगीत घेण्यात आले.
उपक्रम शिवसेनेच्या महिला सभापती जया खंडारे यांनी खा.प्रता पराव जाधव व आ.डॉ.संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित आमदार रायमुलकर म्हणाले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संसद, विधान भवन, शैक्षणिक संस्था, प्रजासत्ताक दिन, स्वा तंत्र्यदिनासह आदी ठिकाणी चांगल्या कामाची, उपक्रमाची सुरुवा त ही राष्ट्रगीताने करण्यात येते. राष्ट्रगीतामुळे मनुष्याला आपल्या देशाप्रती स्फूर्ती मिळते, राष्ट्रीय एकात्मता जागृत होते. त्यामुळे प्र त्येकाला आपल्या राष्ट्रगीताचा अभियान असला पाहिजे, राष्ट्रगी ताचा प्रत्येकाने आदर करावा, असे सांगितले. यावेळी आ.संजय रायमुलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अँड.सुरेश वानखेडे, संचालक राजू चव्हाण, गटविकास अधिकारी पवार, सहायक गटविकास अधिकारी ए.एस.सानप, ओमप्रकाश चिखलेकर, अशोक झाल्टे, शरद जाधव, रमेश घुमरे, सुरेश खंदारकर, रमेश ठाकरे, रवींद्र बोरे, प्रवीण गायकवाड, श्याम गाभणे, अजय माने, अशोक मुळे, शिवाजी पंडागळे, प्रवीण आखाडे, जयश्री महाजन, अरुण गायकवाड, गजानन धोंडगे, विजय खिल्लारे, लता घेवंदे, प्रदीप रहाटे, विशाल धोंडगे, प्री तमसिंह राजपूत, शिवाजी गवई, किरण मगर, गजानन धामणकर, प्रवीण चव्हाण, चंद्रशेखर जोशी, प्रकाश सावंत, मंगला गायकवाड, समाधान राठोड, मोहन तेजनकर, दिलीप पांडव, मंगला देशमुख, रवींद्र साठे, गजानन वराडे, भगवान मापारी सह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.