वृत्तपत्र विक्रेत्यांचे कार्य अतुलनीय -प्रकाश उन्हाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:29 AM2021-01-09T04:29:04+5:302021-01-09T04:29:04+5:30
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष राजेंद्र टिकार, राजेश तायडे, प्रमोद वऱ्हाडे, ता. अध्यक्ष दत्ताभाऊ उमाळे, सय्यद मेहबूब, प्रसिद्ध प्रमुख ...
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष राजेंद्र टिकार, राजेश तायडे, प्रमोद वऱ्हाडे, ता. अध्यक्ष दत्ताभाऊ उमाळे, सय्यद मेहबूब, प्रसिद्ध प्रमुख संतोष गाडेकर उपस्थित होते. प्रारंभी प्रमोद वऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र टिकार यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्यांच्या न्याय्य हक्कासाठी काम करीत असून, लोककल्याणासाठी मंडळ स्थापन करण्यासाठी येत्या २६ जानेवारीला वर्धा येथे आयोजित अधिवेशनात ठाम भूमिका स्पष्ट केली जाणार आहे, असे सांगितले. यावेळी राजेश तायडे, डॉ. श्रीकृष्ण काकडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गेल्या ३५ वर्षांपासून दारोदार वृत्तपत्र वाटप करणाऱ्या ६५ वर्षीय किशोर लाऊडकर, बालूकिसन खराडे यांचा व लोणार येथील प्रमोद वराडे व दत्ताभाऊ उमाळे यांची जिल्हा कार्यकारिणीमध्ये वर्णी लावण्यात आली. अंजनी खुर्द येथील गजानन सरकटे यांचे मेहकर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने, त्याचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. संचालन व प्रास्ताविक मेहकर तालुकाध्यक्ष दत्ता उमाळे यांनी तर आभार शिवप्रसाद थुट्टे यांनी मानले. गजानन सरकटे, विशाल एडसकर, संदीप ढोरे, बाळू खराटे, संग्राम पाटील, सय्यद महेबूब, शिवप्रसाद थुट्टे, अमोल चरखे , दीपक गवळी, प्रमोद मिश्रा, विष्णू वाघ यांसह आदी विक्रेते उपस्थित होते.