विद्यार्थी खाते उघडण्याचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2017 07:07 PM2017-05-15T19:07:46+5:302017-05-15T19:27:30+5:30
खामगाव : शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह अर्ज बँकांकडे सादर केले आहेत. मात्र 2 ते 3 महिन्याचा कालावधी उलटत असतानाही अद्याप बँकांनी विद्यार्थ्यांचे खाते उघडले नाहीत.
ऑनलाइन लोकमत
अहवाल पाठविण्याबाबत शिक्षक अडचणीत
खामगाव : शासनाच्या मोफत गणवेश व इतर योजनांचा निधी यापुढे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. यासाठी शाळांना विद्यार्थ्यांचे बँक खाते काढण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. यानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे खाते काढण्यासाठी संबंधित कागदपत्रांसह अर्ज बँकांकडे सादर केले आहेत. मात्र दोन ते तीन महिन्याचा कालावधी उलटत असतानाही अद्याप बँकांनी विद्यार्थ्यांचे खाते उघडले नाहीत. लवकरच शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार असल्याने वेळेवर धांदल नको म्हणून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक शाळांकडून मागविले आहेत. मात्र बँकाकडून खाते क्रमांक देण्यास सुध्दा विलंब होत आहे. दरवर्षी विविध कारणे देत विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप शाळा सुरु झाल्यानंतर महिना, दोन महिन्याने करण्यात येते. यामुळे स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रमात सुध्दा गणवेश सक्तीचा असताना शाळेकडून गणवेश न मिळाल्याने तसेच आर्थिक परिस्थितीअभावी गणवेश घेवू शकत नसल्याने गणवेशाविना असतात. तशीच परिस्थिती यावर्षी शिक्षण विभागाने नियोजन केले असले तरी बँकांकडून विद्यार्थ्यांचे खाते काढण्यास उशीर होत असल्याने निर्माण होवू शकते.