पालखी महामार्गाचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:46 AM2021-06-16T04:46:17+5:302021-06-16T04:46:17+5:30
खते, बियाणे खरेदीसाठी करावी लागते कसरत सध्या जिजाऊ चौक ते लोणार चौफुली पर्यंत या रस्त्याने तीन चाकी वाहनासह सर्व ...
खते, बियाणे खरेदीसाठी करावी लागते कसरत
सध्या जिजाऊ चौक ते लोणार चौफुली पर्यंत या रस्त्याने तीन चाकी वाहनासह सर्व मोठ्या वाहनांना प्रवेश बंद बंद करण्यात आला आहे. यामुळे कृषी सेवा केंद्र व शेती उपयोगी निविष्ठा विक्रेते यांना त्यांच्या दुकानात माल नेण्यासाठी व दुकानातून शेतकऱ्यांना माल खरेदी करण्यासाठी दुकानात जाता येत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे योग्य प्रकारे नियोजन करून शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण व्हावे याकरता मागणी होत आहे.
शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कृषी निविष्ठा विक्रेत्यांची दुकाने आहेत. याच रस्त्यावर बाजारपेठसुद्धा आहे. मात्र रस्त्याचे काम सुरू असल्याने नियोजनाअभावी शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करण्याकरता अडचणी निर्माण होत आहे. बी-बियाणे व खते नेण्यासाठी त्यांची वाहने कृषी सेवा केंद्रापर्यंत येत नसल्याने शेतकऱ्यांना कमालीचा त्रास होत आहे. महेश गट्टानी, व्यापारी