समृद्धी महामार्गाच्या संरक्षक भिंतीचे काम थांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:37 AM2021-02-09T04:37:49+5:302021-02-09T04:37:49+5:30
संघर्ष समितीच्या वतीने त्यांना या वेळी निवेदन देण्यात आले. १० फूट जागा सोडून संरक्षक भिंतीचे काम चालू करू नका. ...
संघर्ष समितीच्या वतीने त्यांना या वेळी निवेदन देण्यात आले. १० फूट जागा सोडून संरक्षक भिंतीचे काम चालू करू नका. १० फुटांतून शेतकरी वाहने नेऊ शकत नाहीत. हार्वेस्टर कोठून नेणार, असा प्रश्न या वेळी शेतकऱ्यांनी उपस्थित केला. त्यामुळे मोठ्या रोडवर येण्यासाठी सर्व्हिस रोड १५ फुटांचा आवश्यक आहे. आम्ही काम सुरू करू देत नाही, यावर शेतकरी ठाम राहिले. या वेळी आ. डॉ. संजय रायमूलकर यांनाही फोनवरून काम होऊ देत नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची ही मागणी वरिष्ठांना कळविली जाईल, असे आश्वासन दिले. या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, पी. आर. देशमुख, नंदकिशोर देशमुख, राहुल देशमुख, विठ्ठल देशमुख, शत्रुघ्न ढोले, शिवाजी मस्के, केशव वानखेडे, भागवत देशमुख, आशिष जाधव, गजानन देशमुख, ज्ञानबाराव देशमुख, अमाेल जाधव, संताेष नरवाडे, अनंत खाेकले, अविनाश शिंदे आदींसह आंध्रुड, अंजनी, उमरा देशमुख, पिंप्री माळी येथील शेतकरी हजर होते.
समृद्धी महामार्गाच्या बाजूला १० फुटांचा सर्व्हिस रोड देण्यात येत असून, शेतकऱ्यांसाठी ही आनंदाचीच बाब आहे. परंतु १० फुटांच्या या सर्व्हिस रोडवरून हार्वेस्टर किंवा इतर कुठले मोठे वाहन कसे नेता येईल. त्यामुळे समृद्धी महामार्गाच्या बाजूला १५ फुटांचा सर्व्हिस रोड देण्यात यावा, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे.
- प्रदीप देशमुख, अध्यक्ष, संघर्ष समीती