राहेरीच्या पुलाचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:36 AM2021-09-03T04:36:08+5:302021-09-03T04:36:08+5:30
पुलाचे बांधकाम घेतलेल्या ठेकेदारावर कोणतेही निर्बंध नसल्याने मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. सात ते आठ महिन्यापासून सुरू असलेले हे ...
पुलाचे बांधकाम घेतलेल्या ठेकेदारावर कोणतेही निर्बंध नसल्याने मनमानी पद्धतीने काम सुरू आहे. सात ते आठ महिन्यापासून सुरू असलेले हे काम अजूनही किती दिवसांनी पूर्ण होईल हे सांगणे मात्र अशक्य झाले आहे. ठेकेदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे व मनमानी कारभारामुळे नादुरुस्त असलेल्या खडकपूर्णा नदीवरील पुलावरून वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या प्रकाराकडे प्रशासकीय यंत्रणेचे जाणूनबुजून दुर्लक्ष होते की काय? असा सवाल पंचक्रोशी मधील ग्रामस्थांमध्ये उपस्थित झाला आहे. नादुरुस्त असलेला हा पूल या पुलाचे नवीन बांधकाम करण्याकरिता शासनाकडून निधी देण्यात आला असून, वाहतूक बाजूने पर्यायी बनवण्याकरिता शासन यापूर्वीही चार ते पाच वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा घाट संबंधित खात्याने घातल्यामुळे लाखो रुपयाची दुरुस्ती करूनसुद्धा नादुरुस्त राहिला. आजही या पुलाची दुरुस्ती करणे सुरू केले असल्याचे दिसून येत आहे. सुरू असलेला पूल बांधण्याचे काम संथ गतीने चालविल्यामुळे प्रश्नांना याठिकाणी वाव मिळाला आहे. मात्र या पुलावरून नादुरुस्त असल्यामुळे वाहतूक बंद केली गेल्यामुळे व पर्यायी रस्त्याचे काम हे विनाकारण ठेकेदाराच्या मनमानीमुळेही लांबणीवर टाकल्या जात असल्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना जीव गमवावा लागला आहे. याचे सोयरसुतक या लोकांना दिसून येत नाही. अशाच प्रकारे येथेे पुलाच्या दुरुस्तीचे काम करणे सुरू असताना या पुलावरून होणारी जड वाहतूक काम करणाऱ्या कामगारांच्या जीवावर उठू शकते.
पोलीस असूनही मग वाहने येतात कशी ?
या पुलावरील वाहतूक बंद करण्याकरिता मेहकर येथील बायपास वरून वाहतूक पोलीस चौकी बसवण्यात आली आहे. सिंदखेड राजा वरून सुद्धा ही वाहतूक वळवण्याकरिता पोलीस आहे. मग या पुलावर ही वाहने येतात कशी? हा मोठा प्रश्न आहे. कुणाचे हितसंबंध तर नाही ना असे म्हणायचे सध्या वेळ आली आहे.
मिळतात उडवा-उडवीचे उत्तरे
अनेक महिन्यापासून सुरू असलेले पुलाचे काम पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदारांना सूचना द्यायला हव्या होत्या. परंतु तसे न करता नादुरुस्त असलेल्या या पुलाची डागडुजी करण्याचा हा प्रकार चुकीचा असल्याचे लोक बोलत आहेत. यापूर्वीही अशी पुलाची दुरुस्ती केली ठेकेदार गब्बर झाले. पुलाचे नवीन बांधकाम होण्याऐवजी पुलाच्या रिपेरिंग बाबत विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळतात. मात्र याच प्रकाराबाबत स्पष्ट माहिती मिळत नाही.