काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे कार्य उत्तम- पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:33 AM2021-03-20T04:33:31+5:302021-03-20T04:33:31+5:30
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी या विभागाच्या सविस्तर कार्याचा एक अहवालच या बैठकी त्यांना सादर केला. ...
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे यांनी या विभागाच्या सविस्तर कार्याचा एक अहवालच या बैठकी त्यांना सादर केला. त्याचे अवलोकन केले असता त्यांनी ही बाब स्पष्ट केले. मुंबई येथील गांधी भवनामध्ये ही बैठक झाली. या बैठकीस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ , बी. एम. संदीप, सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष हुसेन दलवाई, भाई नगराळे, मोहन जोशी, माणिक जगताप, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, संजय लाखे प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसच्या अन्य आघाड्यांच्या कार्याचीही सविस्तर माहिती प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले घेतली. बैठकीस प्रदेश युवा काँग्रेसचे सत्यजित तांबे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष अैाताडे, आदिवासी विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आ. आनंदराव गेडाम, असंघटित कामगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष बद्रुजमा, डॉ. जितेंद्र देहाडे, अनुसूचित जाती विभागाच्या महिला शाखेच्या प्रदेश अध्यक्षा प्रतिमा उके ही यावेळी उपस्थित होत्या.
या बैठकीत जिल्हास्तरावर विविध आघाड्यांना अधिक सक्रीय करून पक्ष संघटन वाढविण्यावर भर देण्यात यावा असे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी सांगितले. सोबतच जनसामान्यांची कामे करण्यास प्राधान्य दिले जावे, त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे, असेही शेवटी त्यांनी स्पष्ट केले.