रखडलेल्या शेतरस्त्याच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:36 AM2021-05-27T04:36:32+5:302021-05-27T04:36:32+5:30
रत्नापूर ते जवळा व रत्नापूर ते महागाव हे दोन पांदन रस्त्यांचा वाद सुरू हाेता, तलाठी गणेश बाजड ...
रत्नापूर ते जवळा व रत्नापूर ते महागाव हे दोन पांदन रस्त्यांचा वाद सुरू हाेता, तलाठी गणेश बाजड यांनी पुढाकार घेऊन दोन्ही रस्ते सुरू केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्यावर पावसाळ्यात शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत हाेता़. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता होत असल्यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
यावेळी सरपंच प्रवीण काठोळे व मंडळ अधिकारी वाघमारे, ग्रामपंचायत सचिव बी.ई़. निकम, पोलीस पाटील लक्ष्मण काठोळे, उपसरपंच गजानन ईरेगावकर, बंडू काठोळे, शासकीय कंत्राटदार गणेश सहस्त्रबुद्धे यांच्या सहकार्याने पालकमंत्री पांदन रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून, रत्नापूर ते जवळा रस्ता पूर्णत्वास गेला आहे.