बांधकामावरून पडून मजुराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:14 AM2017-09-12T00:14:58+5:302017-09-12T00:15:26+5:30

Worker's death by falling down from the construction | बांधकामावरून पडून मजुराचा मृत्यू

बांधकामावरून पडून मजुराचा मृत्यू

Next
ठळक मुद्देघराचे बांधकाम करत असताना तोल जाऊन खाली पडलाऔरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: घराचे बांधकाम करत असताना एका २५ वर्षीय  बांधकाम मिस्त्रीचा तोल जाऊन तो खाली पडला. यात गंभीर  मार लागल्याने त्याला औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तेथे  उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने देऊळघाट  गावावर शोककळा पसरली आहे. 
देऊळघाट येथील रहिवासी शेख नजमोद्दीन शेख फखरोद्दीन  हा बांधकाम मिस्त्रीचे काम करीत होता. १0 सप्टेंबर रोजी तो  गावातीलच एका घराचे बांधकाम करण्यासाठी पहिल्या  मजल्यावरील पालकवर चढला होता. दुपारी तीनच्या सुमारास  काम करीत असताना तो तोल जाऊन खाली पडला.
त्याच्या तोंडाला व डोक्याला जबर मार मार लागल्याने त्याला  प्रथम बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात  आले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला  औरंगाबाद येथे हलविण्यात आले. आज सकाळी उ पचारादरम्यान पाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. 

विजेच्या धक्क्याने इसमाचा मृत्यू 
 धामणगाव बढे: येथून जवळच असलेले किन्होळा विद्युत  उपकेंद्रांतर्गत येणार्‍या सारोळा मारोती येथे ११ सप्टेंबर रोजी  सकाळी १0 वाजेदरम्यान शेतामध्ये विजेचा शॉक लागून  एका इसमाचा मृत्यू झाला. याबाबत धामणगाव बढे  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सारोळा मारोती येथील  राजेंद्र कडू व्यवहारे यांच्या शेतात पिण्याचे पाणी  आणण्यासाठी बाबुराव राजाराम व्यवहारे (वय ५६) रा.  सारोळा मारोती ता. मोताळा गेले असता त्यांना इलेक्ट्रिक  खांबाजवळ असलेल्या अर्थिंगच्या ताराचा शॉक लागल्याने  घटनास्थळी त्यांचा मृत्यू झाला. फिर्याद शिवाजी निनाजी  व्यवहारे यांनी दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव  घेऊन पंचनामा केला. 

Web Title: Worker's death by falling down from the construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.