थकीत देणीसाठी कामगारांचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:10 PM2021-02-16T12:10:07+5:302021-02-16T12:10:32+5:30

Buldhana News रात्री उशिरापर्यंत कामगारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या दिला.

Workers stay in the office of the District Deputy Registrar for arrears | थकीत देणीसाठी कामगारांचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मुक्काम

थकीत देणीसाठी कामगारांचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मुक्काम

Next

बुलडाणा : जिजामाता साखर कारखान्याकडे रखडलेली देणी देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा उपनिबंधकासह जिल्हाधिकाऱ्यांंना दिले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कामगारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या दिला.

दुसरबीड येथील जिजामाता साखर कारखाना बंद पडल्यानंतर जवळपास ४५० ते ५०० कामगारांची देणी रखडली आहे. साखर कारखान्याची विक्री होऊनही कामगारांना त्यांचे पैसे मिळालेले नाही. याविषयी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही त्यांना केवळ आश्वासनच मिळत आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी १०० ते १५० कामगारांनी जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात दुपारी दीड वाजता धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन दिले तसेच देणी लवकर न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. निवेदनावर जिजामाता साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष राजन चौधरी, उपाध्यक्ष उत्तम जाधव, विनायक देशमुख यांचेसह इतरांच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Workers stay in the office of the District Deputy Registrar for arrears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.