नाबार्डअंतर्गत कार्यशाळा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:26+5:302021-07-10T04:24:26+5:30
अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील शिंदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीसपाटील भारत शिंदे, उपसरपंच अरुण जाधव, गावविकास ...
अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील शिंदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीसपाटील भारत शिंदे, उपसरपंच अरुण जाधव, गावविकास समितीचे अध्यक्ष गुलाबराव शिंदे, स्वस्तधान्य दुकानदार परमेश्वर शिंदे, माजी सरपंच रामेश्वर वायाळ, दिनकर शिंदे, शाखा व्यवस्थापक गवळी, बँकेचे विष्णू देशमुख, बँक मित्र पवन शिंदे आदी होते. बँक व्यवस्थापक गवळी यांनी यामध्ये नाबार्ड दिवसाचे महत्त्व, आर्थिक साक्षरता तसेच कोविड काळात घेण्यात येणारी काळजी याबद्दल विस्तृत माहिती दिली. सूत्रसंचालन पत्रकार स्वप्नील शिंदे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेचे बँक मित्र पवन शिंदे, संदीप शिंदे, ज्ञानेश्वर पडुळकर यांनी परिश्रम घेतले. शाखेचे व्यवस्थापक गवळी यांनी आभार मानले.
काेविड योध्द्यांचा सन्मान
विदर्भ कोकण शाखेच्या वतीने गावातील कोविड योध्द्यांचा सत्कार केला. यामध्ये रुग्णवाहिकेचे चालक डिगांबर दत्तात्रय शिंदे, सुलोचना वायाळ, शुद्धमती धंदर, भागू जाधव, सुनंदा जाधव, किरण मोरे, शिला शिंदे आदींचा समावेश आहे. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. त्या वृक्षांचे संगोपन, प्रत्येक झाडाची जबाबदारी महिलांना देण्यात आली. झाडे वर्षभर जगल्यास शाखेच्या वतीने त्यांना पुढील वर्षी सन्मानित करण्यात येईल, अशी घाेषणा करण्यात आली.
090721\img-20210708-wa0121.jpg
पाडळी शिंदे फोटो