पर्यावरणपूरक गणेश मूर्तींसाठी कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:20+5:302021-08-21T04:39:20+5:30
उमंग फाऊंडेशनचा उपक्रम सिंदखेडराजा: येथील उमंग फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. २१ ऑगस्ट ...
उमंग फाऊंडेशनचा उपक्रम
सिंदखेडराजा: येथील उमंग फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. २१ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता येथील श्री गोसाविनंदन गणपती मंदिरात ही कार्यशाळा होणार आहे.
संपूर्ण राज्यभर सध्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार व्हाव्यात, यासाठी विविध पर्यावरणवादी संघटना प्रयत्न करीत आहेत. पर्यावरणाचे संतुलन राहावे, यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत येथील युवकांनी सहभाग घेतला असून, उमंग युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित या कार्यशाळेत नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष सागर उगले, सचिव आदित्य पाठक, कार्याध्यक्ष शिवम पाठक, प्रवक्ता राहुल सातपुते यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. नागरिकांनी शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करून त्याची स्थापना करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.