जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांगांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 04:29 PM2018-12-03T16:29:47+5:302018-12-03T16:30:20+5:30
बुलडाणा : विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांगांनी ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले. मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
बुलडाणा : विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांगांनी ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले. मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुनही प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगांना जागतिक दिव्यांग दिनी उपोषण करण्याची वेळ आली. जिल्हा परिषद व पंचायत समितीत २०१५-१८ पासून दिव्यांगासाठी राखीव ३ टक्के निधीचा गैरवापर करणाºया अधिकारी, कर्मचाºयावर कारवाई करावी, दिव्यांगासाठी ५ टक्के निधी खर्च करावा, दिव्यांगांना घरकूल, प्रधानमंत्री आवास, रमाई आवास योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन द्यावा, दिव्यांगांना घरपट्टी, नळपट्टीमध्ये ५० टक्के सवलत देण्यात यावी, दिव्यांगांना व्यवसायासाठी स्टॉल उपलब्ध करुन देण्यात यावा, दिव्यांगांना अंत्योदय, स्वत:चे रेशनकार्ड देण्यात यावे, शासकीय, निमशासकीय कार्यालयात दिव्यांगांच्या अनुशेष भरतीचा फेर आढावा घ्यावा, बीज भांडवल कर्ज योजना व अपंग वित्त विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाºया कर्ज योजना, बँकेकडून होणारी अडवणूक दूर करावी, दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्ड देण्यात यावे, व्यापारी संकुलामधील गाळे दिव्यांगाकरिता राखीव ठेवावे, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार नोकरीकरिता प्राधान्य द्यावे, दिव्यांगांना पेन्शन योजना लागू करावी, दिव्यांग बेरोजगारांना भत्ता सुरु करावा आदी मागण्यांकरिता हे उपोषण करण्यात आले.
यावेळी बुलडाणा जिल्हा मूक बधीर असोसिएशन व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अब्दूल्ला खान मौसिकउल्लाह खान, भाऊराव कचरे, महेश वाघमारे, धनेश नेमाडे, शेख वसिम शेख मुस्ताक, नितीन वाघ, सलीम बेग रफिक बेग, शिवशंकर तायडे, गणेश काकडे, गजानन गव्हाणे, सुरेश मोहिते यांच्यासह जिल्ह्यातील दिव्यांग बांधव उपस्थित होते.