World Sparow Day : गुरुजींच्या अंगणात चिऊताईची शाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 12:00 PM2021-03-20T12:00:46+5:302021-03-20T12:01:02+5:30

World Sparow Day चिमणीला  कृत्रिम परंतु पर्यावरणपूरक घरटे  खामगाव येथील कलाध्यापक संजय गुरव यांनी मिळवून दिले आहे.

World Sparow Day: Chiutai school in Guruji's yard! | World Sparow Day : गुरुजींच्या अंगणात चिऊताईची शाळा!

World Sparow Day : गुरुजींच्या अंगणात चिऊताईची शाळा!

googlenewsNext

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: हल्लीच्या काळात मानवीवस्तीचे रूपांतर काँक्रीटच्या जंगलात झाले आहे. त्यामुळे मानवीवस्तीत आढळणारी घर चिमणी (हाऊस स्पॅरो) किंवा लाकडी चिमणी दिसेनाशी झाली आहे. काँक्रीटच्या जंगलात इवलाशा जीवला घरटे करणे कठीण झाले असतानाच,  चिमणीला  कृत्रिम परंतु पर्यावरणपूरक घरटे  खामगाव येथील कलाध्यापक संजय गुरव यांनी मिळवून दिले आहे. त्यामुळे गुरूजींच्या अंगणात चिऊताईची शाळा भरल्याचे नेहमीच दृष्टीस पडते.
 चिमणीच घर होत शेणाच...येगं-येगं चिऊताई घरट्यात...चिऊताई- चिऊताई दार उघड,चिऊ ये-दाना खा,पाणी पी आणि भूरर्र ऊडून जा अश्या अनेक कविता व गाण्यांचा वर्षाव आमच्या कानांवर पडून,पडून आम्ही लहानाचे मोठे झालो आणि आता म्हातारे होणार. आमच्या बालपणी कवितेच्या ओळीतून भूरर्र उडून गेलेली चिऊताई आता दूरदूर पर्यंत दृष्टीस पडत नाही. पूर्वी अंगणात,खिडकीतून,छपरा खालीच नव्हेतर घरात दिसणारी चिमणी तिचा अधिवास नष्ट झाल्याने शहरापासून लांब निघून गेली आताच्या घडीला काहीशा प्रमाणात शहरा बाहेरच्या भागात किंवा ग्रामीण भागात थोड्या प्रमाणात दिसून येते.
 बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, चंद्रपुर, यवतमाळ, वाशिम, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, मुंबई, नासिक, धुळे, जळगांव (खा), मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश अशा महाराष्ट्रातील जिल्ह्यातच नव्हेतर  विविध राज्यात सुध्दा सरांचा उपक्रम पोहोचला आहे. त्याकरिता त्यांना महाराष्ट्र शासनाचा "सृष्टी मित्र" पुरस्कार २०१५ साली प्राप्त झाला आहे. सन २००७पासून दरवर्षी किमान दोन ते तीन हजार घरटे वितरित करण्यात येत असून त्याकरिता नातेवाईक, मित्र, शेजारी, विद्यार्थी,पालक, सहकारी शिक्षक, सामाजिक संस्था, पत्रकार बंधू यांचे खुप मोठं योगदान आहे. प्रत्येकाने आपल्या अंगणात चिमणी करीता किमान एक घरटे लावा त्यांचे दाना पाण्याची व्यवस्था करून चिमणी व इतरही आपल्या अंगणात येणा-या पक्षांचे संवर्धन करा असा संदेश आपल्या जनजागृतीतून तथा उपक्रमाचे माध्यमातून कलाध्यापक संजय गुरव नेहमीच देत असतात.२० मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून सगळी कडे साजरा केला जातो परंतू कलाध्यापक संजय गुरव यांचा प्रत्येक दिवस हा चिमणी दिवसच असतो म्हणूनच त्यांचे अंगणात व परिसरात कायमच चिऊताई व त्यांचे थवे बघावयास मिळतत.त्यानी तयार केलेल्या व लावलेल्या घरट्याचा चिमण्या सहज स्विकार करतात व त्या प्रत्येक घरट्यात चिमण्या आपल्या पिल्लांना भरवतांनाचे अनेक दाखले संजय गुरव त्याचे कडील छायाचित्र व चलचित्राचे माध्यमातून देतात तसेच त्यांचे कडे गेल्यास प्रत्यक्ष हे सारे अनुभवायला मिळते.अनेक शिक्षक त्यांचा हा उपक्रम आपल्या घरी व शाळा तथा महाविद्यालयात राबवत आहेत. आपणही या उपक्रमात सामिल व्हावे सामिल झाले पाहिजे हीच अपेक्षा. आपल्या घरी अडगळीत टाकून दिलेली खर्डे, खोकी, लाकडी फड्या यापासून पर्यावरणपूरक घरटी तयार करून लावल्यास चिमण्या त्यांचा नक्कीच स्विकार करतात.


 
चिमण्यांना मिळवून दिला हक्कांचा अधिवास!

 चिमणी पक्षी आपली घरटी वळचणीला,सांधी, सापटी, फटीत, मातीच्या भिंतीतील छिद्र, खाच फोटोफ्रेमच्या मागची बाजू, आळोसा अश्या ठिकाणी बनवत असे. संजय गुरव यांनी ‘चिमणी वाचवा’या उपक्रमाचे माध्यमातून संपूर्ण परिसरात चिमण्याना त्यांना पूर्वी सारखाच अधिवास मिळवून दिला व ज्यामुळे त्यांच्या घराच्या परिसरात सगळीकडे चिमण्यांचे थवे मोठ्या प्रमाणावर दृष्टीस पडतात. जणूकाही गुरुजींच्या अंगणात चिवूताईची शाळाच भरली आहे. बाराही महीने सदैव चिमण्यांच्या सोबतच इतरही पक्षांच्या दाना पाण्याची व्यवस्था करून जवळपास त्यांचे अंगणात शभरावर चिमणी घरटे लावली आहेत.

 अशी केली घरट्यांची निर्मिती!
 तननाशक फवारणी मुळे चिमणी व इतर पक्षांना घरट्यात पिल्लांकरीता गादी(कुशन बाऊल )करण्यासाठी लागणारे मऊ गवत साहित्य शोधूनही मिळत नाही व पयार्याने त्या प्लास्टिकच्या मऊ पिशवीचे तुकडे ,प्लास्टीकची दोरे वापरतात जी त्याचे पिल्लांना घातक ठरतात. म्हणून कलाध्यापक संजय गुरव यांनी आपल्या अंगणात सुतळी,चिंध्या तसेच पॅकिंग करीता वापरले जाणारे तांदूळाचे (तणस)गवत पोकळ स्वरूपात वळचणीला बांधून ठेवतात व ह्या चिंध्या, गवत, सुतळी, दोरे यांचा उपयोग चिमण्या आपल्या घरकुल निर्मिती करीता मोठ्या आनंदाने करतात.

Web Title: World Sparow Day: Chiutai school in Guruji's yard!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.