आज जगाला आईन्स्टाईनच्या विचारांची गरज- विलास देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:27+5:302021-09-08T04:41:27+5:30
बुलडाणा : आज संपूर्ण जगालाच शांततेची गरज आहे़ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जागतिक पातळीवरील शांततेसाठी आणि अणुयुद्धाचा धोका टाळण्यासाठी ...
बुलडाणा : आज संपूर्ण जगालाच शांततेची गरज आहे़ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जागतिक पातळीवरील शांततेसाठी आणि अणुयुद्धाचा धोका टाळण्यासाठी जे महान कार्य केले आहे, त्याला इतिहासात तोड नाही. मानवतावादी विवेकी- वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणाऱ्या अल्बर्ट आईन्स्टाईन याच्या विचारांची आज खऱ्या अर्थाने जगाला गरज असल्याचे विचार भारत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विलास देशमुख यांनी व्यक्त केले.
४ सप्टेंबरला भारत विद्यालयात संस्थापक कै. दिवाकरभय्या आगाशे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात नोबेल पारितोषिक प्राप्त जगविख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण माजी मुख्याध्यापक विलास देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत विद्यालयाचे मुख्य संचालक हर्षवर्धन आगाशे होते़ भारत विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विलास देशमुख यांनी अल्बर्ट आईन्स्टाईन याच्याविषयी माहिती दिली़
मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला़ संचालन रमेश इंगळे यांनी तर आभार शारदा एंडोले यांनी केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने भारत विद्यालय संस्थेच्या अध्यक्षा डॉ़ सीमा आगाशे, संचालक उदय देशपांडे, माजी मुख्याध्यापक बी.टी. कुसुंबे, रमेश वानखेडे, रविंद्र इंगळे, शैलाताई मोहिते,नारायण शिब्रे, गजानन एंडोले, गजानन कुळकर्णी, मुख्याध्यापक प्रल्हाद गायकवाड, विवेकानंद गुरुकुंज प्राथमिक शाळा मुख्याध्यापक गजानन इंगळे, भारत विद्यालयाचे उपमुख्याध्यापक मोहन घोंगटे, पर्यवेक्षक नवल गवई यांच्यासह भारत विद्यालयातील शिक्षक-कर्मचारी उपस्थित हाेते़