इंधन दरवाढीविरोधात जागतिक महिलादिनी कॉंग्रेसचे आक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:34 AM2021-03-05T04:34:36+5:302021-03-05T04:34:36+5:30
केंद्राच्या आर्थिक धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. देशातील सार्वजनिक ...
केंद्राच्या आर्थिक धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग विक्री करण्याचा सपाटा केंद्रातील भाजप सरकाने लावला आहे. इंधनावरही विविध कर लावून सर्वसामान्यांची एक प्रकारे आर्थिक परवडच केल्या जात आहे. स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे. सर्वसामान्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. अनेकांना वेतनकपातीचा सामना करावा गात असून लघु व मध्यम उद्योगातील अनेक कामगार बेरोजगार झाले आहेत. डिसेंबरपासून आजपर्यंत जवळपास २०० रुपयांनी गॅस सिलिंडरमध्ये वाढ झाली आहे. ८०० रुपयांचा सिलिंडर घेणे सर्वसामान्यांना आता परवडेनासे झाले आहे. कराशिवाय पेट्रोल व डिझेलची लिटरमागे किंमत अनुक्रमे ३२ रुपये ७२ पैसे आणि डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात करांचा अधिभार मोदी सरकारने लावला आहे. पूर्वी एक रुपया लावण्यात येणारा सेंट्रल रोड फंड आता त्याचे नाव बदलून १८ रुपये करण्यात आला आहे. यासह अन्य बाबींचा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी ऊहापोह करत या धोरणाविरोधात जिल्ह्यात हे आक्रोश आंदोलन जिल्हा तथा तालुकास्तरावर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या नेतृत्त्वात होणाऱ्या या आंदोलनात तालुकास्तरावर व तथा जिल्हास्तरावर कोरोना प्रतिबंधासाठीच्या नियमांचे पालन करून हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, पक्षनेते, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद, पालिका, पंचायत समिती, बाजार समिती सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.