श्रद्धेय बाबूजींचे विचार आजही प्रेरणादायी - बोंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2017 12:49 AM2017-07-03T00:49:13+5:302017-07-03T01:14:56+5:30
चिखली : आदर्शांची रुजवणूक करणारे ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय बाबूजींचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : श्रद्धेय बाबूजींनी घालून दिलेल्या आदर्शावरून वाटचाल करीत ‘लोकमत’ने कायम शोषित, पीडित व वंचितांना न्याय देण्याचे कार्य केले असल्याने, ‘लोकमत’ने सर्वसामान्यांमध्ये एक अढळ स्थान प्रस्थापित केले आहे. या आदर्शांची रुजवणूक करणारे ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय बाबूजींचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंतीनिमित्त लोकमत चिखली तालुका कार्यालयात अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय, प्रशासन, सहकार, शिक्षण, साहित्य, शेती व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने आमदार राहुल बोंद्रे, तहसीलदार मनीष गायकवाड, न.प. मुख्याधिकारी वसंतराव इंगोले, एबीडीओ अमोल ताकभाते, माजी नगराध्यक्ष सलीम मेमन, सुहास शेटे, भाजपा युवा नेते कुणाल बोंद्रे, नगरसेवक पंडितराव देशमुख, गोपाल देव्हडे, भाजपा शहराध्यक्ष सुरेंद्रप्रसाद पांडे, शैलेश बाहेती, भानुदास कुटे, अजीम शेख, संजीव जाधव यांची उपस्थिती होती. दरम्यान, शेतकऱ्यांवर सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे, हवामान बदलामुळे संकटे येत आहेत. शेतमालाचे भाव पडलेले आहेत सोबतच कर्जमाफी व शासनाकडून जाहीर मदत न मिळाल्याने तसेच तुरीचे चुकारे व नोंदणी झालेल्या तुरीचे मोजमाप बाकी असल्याने शेतकरी व शेतीसमोरील या संकटांच्या काळात शेतकऱ्यांना धीर देऊन नवी उमेद दाखविण्यासह चौकटी बाहेर जाऊन नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक आदी प्रत्येक आघाडीवर तत्परता दर्शविणारे वृत्तपत्र म्हणून ‘लोकमत’ने आपली ओळख प्रस्थापित केली असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. प्रास्ताविक व आभार लोकमत तालुका प्रतिनिधी सुधीर चेके पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी लोकमत समाचारचे युसुफ शेख व बळीराम गुंजाळ यांनी परिश्रम घेतले.