भांडण सोडविणा-यास कोयत्याने जखमी केले

By admin | Published: August 26, 2015 11:46 PM2015-08-26T23:46:29+5:302015-08-26T23:46:29+5:30

डोणगाव येथील घटना; गुन्हा दाखल.

The wound was injured by accident | भांडण सोडविणा-यास कोयत्याने जखमी केले

भांडण सोडविणा-यास कोयत्याने जखमी केले

Next

डोणगाव (जि. बुलडाणा): येथे पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमाच्या डोक्यात कोयता मारून जखमी केल्याची घटना २५ ऑगस्ट च्या रात्री १0 वाजता घडली. सुरेश हैबती हरणे व त्याच्या पत्नीमध्ये भांडण सुरू होते. विठ्ठल दौलत आमले हे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले असता, सुरेशने विठ्ठल आमले यांना शिवीगाळ केली व डोक्यात कोयता मारून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. विठ्ठल आमले यांच्या तक्रारीवरून सुरेश हरणेविरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: The wound was injured by accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.