यात्रा, उत्सवांना काेराेनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:32 AM2021-03-25T04:32:40+5:302021-03-25T04:32:40+5:30
चिमणी दिनानिमित्त पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय बुलडाणा : शहरात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने ...
चिमणी दिनानिमित्त पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय
बुलडाणा : शहरात जागतिक चिमणी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्ताने अनेक नागरिकांनी उन्हाळ्यात आपल्या घरातील तसेच परिसरामध्ये पशु-पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची खाद्याची व्यवस्था टाकाऊ वस्तूंपासून करण्यात आली.
लाॅकडाऊनमुळे छायाचित्रकार आर्थिक संकटात
बुलडाणा : कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातल्यामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम लग्न सोहळ्यासह इतर धार्मिक कार्यक्रमांवर झाला आहे. परिणामी वाहनधारकांसह छायाचित्रकारांचा व्यवसाय धोक्यात आला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
गावाच्या विकासासाठी एकत्र या : शिंपणे
बुलडाणा : ग्रामीण भागात शेती, उद्योग, शिक्षण क्षेत्रात काेराेनामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. या संकटाला सामोरे जात असताना ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच आपल्या गावाचा विकास साधण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता डी. टी. शिंपणे यांनी केले.
विद्युत विभागाकडून कोराेना योद्ध्यांचा सत्कार
बुलडाणा : जिल्हा सामान्य रुग्णालयातील विद्युत पुरवठा अविरतपणे चालू ठेवण्यासोबतच रुग्णालयातील विद्युत संच मांडण्याचीही यशस्वीरित्या देखभाल व दुरुस्ती केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विद्युत उपविभागाचे तारतंत्री कर्मचारी महेंद्र केशपागे, देवानंद ताठे यांना नागपूर प्रादेशिक विद्युत मंडळाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
काेविड सेंटरची एसडीओंनी केली पाहणी
जानेफळ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह तलाठी कार्यालयाला २३ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी अचानक भेट दिली. दरम्यान, त्यांनी कोविड सेंटरची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना लसीकरणासंदर्भात जनजागृती करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांनी केले आहे.
कृषी सल्ला पत्रिका शेतकऱ्यांनी समजून घ्यावी
बुलडाणा : बदलत्या हवामानानुसार शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यासोबत जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे विस्तारित करण्यात येत असलेली हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका प्रत्येक शेतकऱ्याने समजून घ्यावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत जायभाये यांनी केले आहे.
बसचालक, वाहकांना लसीची प्रतीक्षा
बुलडाणा : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बुलडाणा जिल्ह्यातील विविध आगारातील चालक व वाहकांना दररोज प्रवाशांच्या गर्दीशी सामना करावा लागत आहे. परंतु त्यांना मागणी करुनही अद्याप काेराेना लस मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, त्यांना लसीकरणाची प्रतीक्षा कायम आहे.
पांदण रस्त्याच्या कामास प्रारंभ
चिखली : तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शेत रस्ता माती कामाचे उद्घाटन करून रस्ता कामास सुरूवात करण्यात आली.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, शिवाजीराव देशमुख, किशोर पाटील, तलाठी शेजोळ, रामेश्वर पवार, सरपंच भारत पानझाडे व इतर उपस्थित हाेते.
बोराखेडीच्या जि. प. शाळेला आदर्श शाळेचा बहुमान
माेताळा : शहराला लागून असलेल्या व ग्रामीण भागातील उपक्रमशील शाळा म्हणून ओळख असलेल्या बोराखेडी येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेची शासनाच्या आदेशानुसार आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या शाळेने पुन्हा एकदा तालुक्याच्या शीरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
आपची बुलडाणा शहर कार्यकारिणी गठीत
बुलडाणा : आम आदमी पार्टीच्या वतीने बुलडाणा शहर नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ही नवीन कार्यकारिणी शेख इरफान शेख बुढन शहर संघटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
या शहर कार्यकारिणीमध्ये शेख रहीम शेख करीम शहर संयोजक, अलीम पठाण शहर संयोजक, अविनाश खंडागळे शहर सहसंयोजक, भगवान अवसरमोल यांची शहर सचिवपदी निवड करण्यात आली आहे.