पिंपळगाव देवी येथील यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:36 AM2021-02-05T08:36:35+5:302021-02-05T08:36:35+5:30
मोताळा : तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील जगदंबा देवी संस्थान येथे होणारा यात्रा उत्सव कोविड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात ...
मोताळा : तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील जगदंबा देवी संस्थान येथे होणारा यात्रा उत्सव कोविड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे.
कोविड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम तसेच अन्य मोठ्या प्रमाणावर गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड १९ साथरोगाची लाट पुन्हा उफाळून गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असल्यामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पिंपळगाव देवी येथील यात्रा उत्सवास परवानगी देण्यात आली नाही. मात्र मंदिराच्या आतील कार्यक्रमांसाठी १० भाविकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे.
या सोहळ्याकरिता उपस्थितांना मास्क वापरणे बंधनकारक राहणार असून थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी करणे अनिवार्य आहे. कार्यक्रमात उपस्थित व्यक्तींनी ‘आरोग्य सेतू’ ॲप डाऊनलोड करावे. सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी हात धुण्यासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था असावी. भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था करण्यात यावी. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे जिल्हा दंडाधिकारी एस. रामामूर्ती यांनी कळविले आहे.